AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makhana | रणबीरपासून ट्विंकलपर्यंत अनेक बॉलिवूडकरांच्या फिटनेसचं गुपित ‘मखाणा’, वाचा याचे फायदे…

करिना कपूर-खान, रणबीर कपूर ते ट्विंकल खन्नापर्यंत सगळेच सेलिब्रेटी ब्रेकफास्टमध्ये ‘मखाणे’ खातात. मखाण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोडाइड्रेट असतात.

Makhana | रणबीरपासून ट्विंकलपर्यंत अनेक बॉलिवूडकरांच्या फिटनेसचं गुपित ‘मखाणा’, वाचा याचे फायदे...
| Updated on: Jan 12, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बॉलिवूड सेलेब्स योग्य आहार आणि व्यायामाचा अवलंब करतात. त्यांचे सर्वाधिक लक्ष त्यांच्या पौष्टिक आहारावर केंद्रित असते. सेलेब्समध्ये त्यांच्या आहारात प्रथिने, कर्बोदकांमधे, चरबी आणि फायबरचा संतुलित घटकांचा समावेश करतात. इतकेच नाही तर, स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ते आपल्या नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात (Bollywood celebrities loves to eat makhana in breakfast for good health).

करिना कपूर-खान, रणबीर कपूर ते ट्विंकल खन्नापर्यंत सगळेच सेलिब्रेटी ब्रेकफास्टमध्ये ‘मखाणे’ खातात. मखाण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोडाइड्रेट असतात. तसेच, त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. मखाणे खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. या घटक आपला संध्याकाळचा नाश्ता हेल्थी आणि चवदार बनवतो. त्यासाठी तुम्ही देखील मखाणा ट्राय करू शकता.

रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नवी दिल्लीत दाखल झाला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर पहिल्यांदा रणबीरसोबत दिसणार आहे. रणबीरच्या फिटनेसवर सगळ्याच मुली घायाळ आहेत. प्रत्येकाला त्याच्या फिटनेस आणि डाएटबद्दल जाणून घ्यायचे असते. रणबीर आपल्या आहारात रोस्टेड नट्स खातो. यात काजू, मनुका, बदाम इत्यादींचा समावेश असतो. दिवसात दोन ते तीन वेळा रणबीर रोस्टेड नट्स खातो.

करिना कपूर

फिटनेसच्या बाबतीत करिना कपूर अनेक नवीन अभिनेत्रींना मागे टाकते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी बेबो तिच्या दिवसाची सुरुवात बदाम आणि केळी खाऊन करते. त्यानंतर ती जिममध्ये जाते. तिचा आवडता नाश्ता ‘मखाणा’ आहे. मखाणा खाल्ल्याने पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. त्यात कमी कॅलरी असतात. म्हणूनच बेबो इतकी फिट दिसते.

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना सध्या चित्रपटांपासून दूर असली, तरी ती तिच्या फिटनेसबाबत तडजोड करत नाही. ट्विंकल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना 21 दिवसाचे फिटनेस चॅलेंज दिले होते. यावेळी अभिनेत्रीने तिची फिटनेस रहस्य शेअर केली. नाश्त्यासाठी ट्विंकलला ग्लूटेन फ्री मखाणा खायला आवडतो (Bollywood celebrities loves to eat makhana in breakfast for good health).

कॅटरिना कैफ

बॉलिवूडची ‘चिकनी चमेली’ कतरिना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी डाएट प्लॅनवर विशेष लक्ष देते. कतरिना आपल्या दिवसाची सुरुवात ब्रेड, ओटमील आणि एक ग्लास दूध पिऊन करते. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तिला मखाणा खायला आवडतो.

मखाणाचे फायदे :

– मखाण्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक आणि सोडीयम कमी प्रमाणात असल्याने रक्तदाबामध्ये होणारा चढ उतार नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच हृद्यविकारांचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते.

– त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील मखाणा उपयुक्त आहे. त्यामधील अ‍ॅन्टी एजिंग एन्झाईम्स त्वचेला अधिक सतेज बनवते.

– मखाणा ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे बाजरी, ज्वारी आणि सोयाबीनच्या पीठासोबत मखाणाचे पीठ मिसळून केलेली भाकरीदेखील अत्यंत पोषक पर्याय आहे.

– Kaempferol सारखे नॅचरल फ्लॅवोनॉईड्स मखाण्यात असल्याने शरीरात दाह कमी करण्यास मदत होते.

(Bollywood celebrities loves to eat makhana in breakfast for good health)

हेही वाचा :

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.