
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. नुकताच आता अनुपम खेर यांनी आपल्या मनातील खदखद अखेर व्यक्त केलीये. अनुपम खेर हे म्हणाले की, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार न मिळाल्याने नाराज होण्याचा अधिकार नक्कीच माझ्याकडे आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, द काश्मीर फाईल्स चित्रपटात माझी भूमिका ही पूर्णपणे भावपूर्ण आहे. मला तिथे भावना दाखवण्याची अजिबात गरज नाही पडली.
मी माझ्या भावनांमध्ये सत्य आणण्याचा प्रयत्न करतो. पुढे अनुपम खेर म्हणाले, मुळात म्हणजे ज्या लोकांना हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले ते पूर्णपणे त्याचे हकदार आहेत. मी ज्यावेळी पुष्पा हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला तेंव्हाच मी अल्लू अर्जुन याचे काैतुक केले. अनुपम खेर हे सर्वकाही पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिसले.
अनुपम खेर हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. विषय कोणताही असो आपले मत स्पष्टपणे मांडताना कायमच दिसतात. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर सर्वात अगोदर पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे खूप जुने मित्र आहेत.
सतीश कौशिक यांच्या मुलीसोबत रिल्स तयार करताना अनुपम खेर हे दिसले. अनुपम खेर यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनुपम खेर त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मुळात म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित झाल्यानंतर अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यादीमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला अनेक पुरस्कार हे मिळाले. मात्र, द काश्मीर फाईल्स चित्रपटासाठी बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा अनुपम खेर यांना मिळाला नाही. बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनुपम खेर यांनाच मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात अल्लू अर्जुन याला पुरस्कार मिळाला.