AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींनी लग्नासाठी बॉलिवूडला राम राम ठोकला.... अनेक अभिनेत्रींनी तर, स्वतःच्या धर्माचा त्याग करत मुस्लीम धर्म स्वीकारला... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

लग्नासाठी मुसलमान झाली... वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय... आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
| Updated on: Apr 10, 2026 | 10:18 AM
Share

बॉलिवूडमध्ये असंख्य अभिनेत्रींनी पदार्पण केलं आणि स्वतःची ओळख भक्कम केली. पण चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री अचानक गायब झाल्या… अशात अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री तिने मॉडेलिंगमधून करियरची सुरुवात केली आणि त्यानंतर मोठ्या पडद्यावर स्वतः एक खास ओळख निर्माण केली. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना तिच्या आयुष्यात एका मुस्लीम व्यक्तीची एन्ट्री झाली आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने देखील स्वतःच्या धर्माचा त्याग करत मुस्लीम धर्मा स्वीकारला.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टार्झन : द वंडर कार सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आयेशा टाकिया आहे… आयेशा हिने अवघ्या वयाच्या 13 व्या वर्षी करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही… अनेक जाहिरातींमध्ये देखील तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

त्यानंतर आयेशा हिने मॉडेलिंगची सुरुवात केली. आयेशा पहिल्यांदा बालकलाकार म्हणून अभिनेता शाहिद कपूरसोबत ‘कम्प्लेन’च्या जाहिरातीत दिसली होती. तिने डिस्ने चॅनलसाठी देखील काम केलं आहे, जिथे तिला महिन्याला 8 हजार रुपये मानधन मिळत होतं… आज अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे.

त्यानंतर 2000 मध्ये आयेशा हिने गायक फाल्गुनी पाठत यांच्या ‘मेरी चुनर उड उड जाए’ गाण्यासाठी काम केलं… त्यानंतर आयेशा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही… अखेर आयेशा हिला बॉलिवूडमधून देखील ऑफर मिळण्यास सुरुवात झालेली.

लग्नासाठी सोडली इंडस्ट्री

2004 मध्ये आयेशा हिने अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘टार्जनः द वंडर कार’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण आयेशा हिच्या अभिनयाचं कौतुक झालं… तिला बेस्ट फीमेल डेब्यू या पुरस्काराने देखील गौकविण्यात आलं… त्यानंतर 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ सिनेमातून अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली. दोन वर्षांनंतर, 2011 साली आलेल्या ‘मोड’ सिनेमानंतर आयेशाने अचानक इंडस्ट्री सोडली.

आयेशा टाकिया ‘दिल मांगे मोर’, ‘सोचा ना था’, ‘शादी नं. 1’, ‘डोर’ आणि सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ यांसारख्या सिनेमांमध्येही दिसली. 2009 मध्ये, तिने राजकारणी अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्याशी लग्न केले. या लग्नासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि सिनेमामधून ब्रेक घेतला. त्यांना मिकायल नावाचा एक मुलगा आहे. आयेशा आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...