सोनाक्षी सिन्हा हिचा पती जहीर इक्बाल याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, घरात पोहोचताच…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिनेत्री सध्या तिच्या सासरच्या लोकांबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. लग्नाला 16 महिने पूर्ण झाल्यानंतर तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सोनाक्षीच्या लग्नाला आता 16 महिने पूर्ण झाली. अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत तिने लग्न केले. लग्नाच्या काही वर्ष अगोदर दोघांनी एकमेकांना डेट करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या सोनाक्षी तिच्या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करत आहे. सोनाक्षीने ही पहिल्यांदाच जाहीरपणे जहीर इक्बाल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल बोलत आहे. लग्नानंतर अनेकदा जहीर इक्बालसोबत विदेशात जाताना सोनाक्षी दिसली. सोनाक्षीने जहीर इक्बाल याच्या कुटुंबासोबत कसे नाते आहे आणि तिच्या सासूबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या.
नुकताच आता सोनाक्षी सिन्हा हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जहीर इक्बाल याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, मी माझ्या काम आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जास्त स्पष्ट आहे. ज्यावेळी मी सेटवर असते, त्यावेली मला जे करायचे असते ते मी करते. घरात पोहोचताच मी सेटवरील सर्व गोष्टी दूर ठेवते आणि तिथेच सोडते. मुळात म्हणजे घर माझ्यासठी शांतीचे ठिकाण आहे. ही गोष्ट जहीरला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे.
जहीर कधीच माझ्या कामात हस्तक्षेप करत नाही. उलट तो मला मदत करतो. तो माझे काम समजतो. त्याला माझा खूप जास्त अभिमान आहे, तो याबद्दल मला नेहमीच बोलतो. तो मला बोलतो की, तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. मुळात म्हणजे तो फक्त माझा जोडीदार नाही तर तो खूप मोठा चीअरलीडर आहे. तो असा व्यक्ती आहे की, माझ्या पाठिमागे कायमच उभा असतो, शांतपणे पण अगदी मनापासून.
जहीर इक्बाल याने काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत माझी सैतान असे म्हटले होते. जहीर सोनाक्षी सिन्हाला सपोर्ट करताना दिसतो. दोघांचे मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. दोघे एकमेकांसोबत खास वेळ घालवताना कायमच दिसतात. काही दिवसांपूर्वीच विदेशात मस्ती करताना जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा दिसले होते.
