AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या 16 महिन्यामध्येच जहीर इक्बाल याच्याबद्दल केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी अशा व्यक्तीसोबत लग्न…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षीने लग्नाच्या काही महिन्यांनंतर पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले.

सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या 16 महिन्यामध्येच जहीर इक्बाल याच्याबद्दल केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी अशा व्यक्तीसोबत लग्न...
Bollywood actress Sonakshi Sinha
| Updated on: Nov 06, 2025 | 10:23 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले असून मागील काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, सोनाक्षी तिच्या आणि जहीरच्या पहिल्या बाळाला जन्म लवकरच देणार आहे. मात्र, सोनाक्षीने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मी गेल्या 16 महिन्यांपासून प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. सोनाक्षीने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहीर करताच सर्वांना मोठा धक्का बसला होता. सोनाक्षीने जहीरसोबत सिव्हिल मॅरेज केले. विशेष म्हणजे तिच्या या लग्नात तिचे आई वडील तिच्यासोबत ठामपणे उभे होते. सोनाक्षी लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारणार का? अशा विविध चर्चा त्या दरम्यान रंगताना दिसल्या.

आता लग्नाच्या 16 महिन्यांनंतर सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सोनाक्षी म्हणाली की, मला एक विश्वास आहे की, प्रेम कायमच जिंकते. मग काहीही असो. लोक जरी तुमचा व्देश करत असतील तरीही तिथे प्रेम असते आणि ते जिंकत असते. माझा यावर ठामपणे विश्वास आहे. मी फक्त प्रयत्न केली. मला लोक म्हणतात की, तू खूप जास्त धाडसी आहेस. तू फक्त तुझे ऐकले आणि त्याच्यासोबत लग्न केले.

पुढे सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, मी अशा व्यक्तीसोबत लग्न केले, ज्याच्यावर मी प्रेम केले. मुळात म्हणजे मी काही मुद्दाम वगैरे हे सर्व केलेले नाही. या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची लव्ह स्टोरी फार कमी लोकांना माहिती होती. दोघांची पहिली भेट सलमान खानच्या घरातील एका पार्टीत झाली आणि पहिल्याच भेटीमध्ये दोघे कितीतरी तास गप्पा मारत होते.

सोनाक्षीने जहीरसोबत लग्न करत असल्याचे जाहीर करण्याच्या अगोदर यांच्या नात्याबद्दल लोकांना फार काही माहिती नव्हते. सोनाक्षीने अनेक वर्ष जहीरला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जहीर इक्बाल याने काही चित्रपटांमध्ये काम केले. जहीर हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक असून मुंबईमध्ये ते अत्यंत आलिशान अशा घरात राहतात. कायमच सोनाक्षी जहीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...