Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Amitabh Bachhan Corona Positive) आहे.

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Amitabh Bachhan Corona Positive) आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या ट्वीटनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांनी, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी ट्वीट करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली (Amitabh Bachhan Corona Positive) आहे.

सुदैवाने बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“गेट वेल सून बच्चनजी, तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्वीट पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने केले आहे.

“तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते, गेट वेल सून सर, लॉट्स ऑफ लव्ह”, असं ट्वीट अभिनेत्री क्रिती सेनॉनने केले आहे.

“गेट वेल सून सर”, असं ट्वीट अभिनेता सोनी सुदने केले आहे.

“तुम्हाला खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा, तुम्ही काळजी घ्या, लवकरच बरे व्हाल”, असं ट्वीट अभिनेत्री नेहा धुपियाने केले आहे.

“आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि खूश राहाल, चॅम्प”, असं ट्वीट अभिनेत्री तापसी पन्नूने केले आहे.

“अमिताभजी मी पूर्ण देशासोबत मिळून प्रार्थना करतो तुम्ही लवकर बरे व्हाल, तुम्ही या देशातील लाखो लोकांचे आयडॉल आहात. एक प्रसिद्ध सुपरस्टार आहात. आम्ही तुमची काळजी घेऊ”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

“काळजी घ्या अमित जी, तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्वीट माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

“आदरणीय बच्चनजी, तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींना सामोरे जात विजय मिळवला आहे. मला आणि देशाला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही कोरोनावर मात करुन सुखरुप घरी पोहोचाल. आमच्या सर्वांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहे”, असं ट्वीट अभिनेता अनुपम खेर यांनी केले आहे.

“बच्चनजी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्वीट उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी केले आहे.

“अमिताभ बच्चना यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे ऐकून खूप दु:ख झाले. ते बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते. गेट वेल सून”, असं ट्वीट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *