Smit Machhar : कमाल केली पायलट जी… सलमान ते परेश रावल, बॉलिवूड सेलिब्रिटींनी केला स्मित मच्छारवर कौतुकाचा वर्षाव
फ्लायदुबईचे पायलट स्मित मच्छार यांच्या धाडस आणि शौर्यामुळे अनेकांचा जीव वाचला, जगभरातून त्यांचं कौतुक होतंय. देशभरातील नागरिकही त्यांची प्रशंसा करत असून बॉलिवूड कलाकारही त्यात मागे नाही, अनेकांनी त्याची स्तुती केली सुपरस्टार सलमान खानने देखील स्मितच कौतुक केलंय.

Bollywood Stars Reaction on Smit Machchhar : 30 सप्टेंबरला जेव्हा फ्यादुबईचं FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होतं, तेव्हाच एक धक्कादायक घटना घडली. त्यामुळे विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात होता. या विमानाचे भारतीय वंशाचे पायलट स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्या को-पायलटने हल्ला केला. मात्र त्यानंतरही स्मित यांनी असीम धाडस आणि शौर्य दाखवत त्याला प्रतिकार केला, तसेच कॉकपिटचा दरवाजा उघडला. यानंतर प्रवाशांनी आत धाव घेत हल्लेखोर पायलटला ताब्यात घेतलं आणि विमानावर नियंत्रण मिळवत सुरक्षित लँडिंग केलं. यानंतर जगभरातन मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक होत असून अनेकांनी त्याचं अभिनंदन केलंय. भारातातून कोट्यवधी नागरिकांनी मच्छार यांची स्तुति केली असून बॉलिवूडकर सेलिब्रिटीदेखील मागे राहिलेले नाहीत. सुपरस्टार अभिनेता सलमान खान पासून ते परेश रावलपर्यंत अनेकांनी मच्छारची प्रशंसा केली.
सलमान खानने केलं कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचं आणि शौर्याचं कौतुक केलं आहे. सलमानने त्यांचं अभिनंदन करत म्हटलं, “कमाल केली पायलट जी. आम्ही सर्व तुम्हाला सलाम करतो. तुमच्यासोबत उड्डाण करणं आमच्यासाठीही अभिमानाची गोष्ट असेल. खूप खूप शुभेच्छा, कॅप्टन भाई.”
Kamaal kar diya pilot ji, hum sab aap ko salute karte hain will be a pleasure to fly with u.. Well done bro.. Capt #SmitMachchhar
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 2, 2026
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचं देशभरातून कौतुक होत असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. मूळचे महाराष्ट्रातील घाटकोपरचे रहिवासी असलेले स्मित सध्या अबू धाबी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
परेश रावल यांना आठवला नाना पाटेकरांचा डायलॉग
अभिनेता आर. माधवन यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर कॅप्टन स्मित मच्छार यांच्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश शेअर करत त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छा दिल्या.
तर अभिनेता विजय देवरकोंडा यांनीही पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश शेअर करत कॅप्टनसाठी प्रार्थना केली. त्यांनी लिहिलं, “कॅप्टन, देव तुम्हाला सुरक्षित ठेवो. तुम्ही सर्वांसोबत मिळून जे सहन केलं आणि जे केलं, ते अद्भुत आहे.” दरम्यान, अभिनेता परेश रावल यांनी या प्रसंगी नाना पाटेकर यांच्या लोकप्रिय संवादाची आठवण करून देत म्हटलं, “एका मच्छर आदमी को …”
Remembering NANA PATEKARS FAMOUS DIALOGUE:
Ek Machhhar Aadmiko …!— Paresh Rawal (@SirPareshRawal) October 1, 2026
रवी किशन काय म्हणाले?
अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, अनेक जखमा सहन करूनही स्मित यांनी धैर्य, साहस आणि जिद्दीने आपली ड्यूटी पार पाडली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 100 हून अधिक लोकांचे प्राण वाचवण्याचं त्यांचं कार्य हे केवळ एक उदाहरण नसून प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे.
कर्तव्य के प्रति अटूट निष्ठा, अदम्य साहस और असाधारण सूझबूझ का नाम हैं Captain Smit Machchhar। 🇮🇳
गंभीर रूप से घायल होने के बावजूद स्वयं की चिंता किए बिना सैकड़ों लोगों के जीवन की रक्षा के लिए जिस साहस, धैर्य और कर्तव्यपरायणता का उन्होंने परिचय दिया, वह न केवल अनुकरणीय है, बल्कि… pic.twitter.com/s1FtT7iEAm
— Ravi Kishan (@ravikishann) October 1, 2026