AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lawrence Bishnoi vs Dawood Ibrahim : बिश्नोई गँग तर दाऊद इब्राहिमची पण बाप, त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे, मुंबईच्या अंडरवर्ल्डचा नवा डॉन लॉरेन्स?

Lawrence Bishnoi vs Dawood Ibrahim : मुंबईच्या गुन्हेगारी पटलावरचा राजा बदलला आहे. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशत होती. बॉलिवूडमध्ये त्याचं राज्य होतं. पण आज मुंबईत स्टार टायगर श्रॉफ बरोबर जे झालं ते थेट मुंबई पोलिसांना चॅलेंज आहे.

Lawrence Bishnoi vs Dawood Ibrahim : बिश्नोई गँग तर दाऊद इब्राहिमची पण बाप, त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे, मुंबईच्या अंडरवर्ल्डचा नवा डॉन लॉरेन्स?
Lawrence Bishnoi vs Dawood Ibrahim
| Updated on: Oct 18, 2026 | 10:47 PM
Share

बॉलिवूड पुन्हा एकदा हादरलं आहे. बॉलिवूड ही मुंबईची ओळख आहे. याच बॉलिवूडचा हिरो अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर आज जुहु येथील पुष्पापार्क मध्ये गोळीबार करण्यात आला. टायगर श्रॉफ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर अत्यंत जवळून गोळीबार झाला. टायगरच्या कारचा चालक आणि एक रिक्षावाला यात जखमी झाले. लॉरेन्स बिश्रोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्रोई गँगने याआधी सुद्धा बॉलिवूड स्टार्सना धमक्या दिल्या आहेत. सलमान खान पासून लांब राहा हेच ते बॉलिवूड स्टार्सना सांगत आहेत. दोन वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगने आमदार बाब सिद्दीकी यांची हत्या केली होती. ते सुद्धा सलमान खानचे निकटवर्तीय होते. आता टायगर श्रॉफवर गोळीबार झालाय. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगची दहशत होती. आता ती जागा लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. ते चार पावलं दाऊदपेक्षा पुढे आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. बिश्नोई गँगची दाऊदची पण बाप आहे.

मुंबईत स्टार टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार हे थेट मुंबई पोलिसांना चॅलेंज आहे. कारण याआधी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यावेळी सुद्धा बिश्नोई गँगवर दहशत बसेल अशी कारवाई दिसली नव्हती. याआधी अंडरवर्ल्ड मधल्या अशा गुंडांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये थेट यमसदनी धाडलं होतं. दाऊद इब्राहिम गँगसारखच लॉरेन्स बिश्नोई गँगने गुन्हेगारीचं साम्राज्य उभारलं आहे. दोन वर्षांपूर्वी इंडिया टुडेने वृत्त दिलं होतं. त्यानुसार लॉरेन्स बिश्नोई गँगचे जवळपास 700 शूटर होते. दाऊद इब्राहिमने मुंबईत डोंगरी भागात छोट्या-मोठ्या गुन्ह्याने सुरुवात केली होती. पुढे 90 च्या दशकात भारताबाहेर त्याने आपल्या गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार केला. रिअल इस्टेट, बॉलिवूड प्रत्येक क्षेत्रात आपला धाक निर्माण केला. आज लॉरेन्स बिश्नोई गँगचा सुद्धा कारभार तसाच आहे. परदेशातून त्यांचं गुन्हेगारीचं नेटवर्क चालतं. त्यामुळे त्यांच्यापर्यंत भारतीय तपास यंत्रणांचे हात सहजासहजी पोहोचू शकत नाहीयत.

दाऊद आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये फरक काय?

दाऊद इब्राहिमने ड्रग्स नेटवर्क, टार्गेट किलिंग, खंडणी रॅकेट या माध्यमातून पैसा कमावला. पुढे डी- कंपनी म्हणून स्वत:ला स्थापित केलं. नंतर पुढे जाऊन पाकिस्तानी ISI सोबत हात मिळवणी करुन अजून गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार केला. बिश्नोई गँगचा कारभार सुद्धा असाच आहे. फरक इतकाच आहे की, दाऊदने मुंबईतून गुन्हेगारी साम्राज्याची सुरुवात केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने उत्तर भारतातून गुन्हेगारी टोळीची सुरुवात केली.

बिश्नोई गँगकडे किती शूटर्स?

सतविंदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारर लॉरेन्स बिश्नोई गँग चालवतो. भारतीय तपास यंत्रणा तसचं कॅनडाच्या पोलीस या गोल्डी ब्राररच्या मागावर आहेत. NIA च्या आरोपपत्रानुसार लॉरेन्स बिश्नोई गँगकडे 700 शूटर्स आहेत. त्यातले 300 एकट्या पंजाबमधील आहेत. महत्वाचं म्हणजे बिश्नोई गँग आपल्या विस्तारासाठी सोशल मीडियाचा वापर करते. दाऊद गँगकडे त्यावेळी अशी व्यवस्था नव्हती.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा विस्तार कसा झाला?

लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारर आपले फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असतात. आपल्या नेटवर्कच्या विस्तारासाठी बिश्नोई गँग सोशल मीडियाचा भरपूर वापर करते. 2020-21 मध्ये बिश्नोई गँगने खंडणीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची माया जमवली. तो सर्व पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आला.

बिश्नोई गँग देशातील किती राज्यात सक्रीय?

पंजाब, उत्तर प्रदेश,हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंड या राज्यात आज लॉरेन्स बिश्नोई गँग सक्रीय आहे. सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून या टोळीत भरती सुरु असते. कॅनडा किंवा परदेशात त्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठवण्याचं आमिष दाखवून ही गँग तरुणांची भरती करते.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,