AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडला दणका! रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे; सिनेमांच्या आड पैशांचा खेळ उघड?

बॉलिवूडला पुन्हा एकदा मोठा दणका बसला आहे... रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाने छापे टाकत मोठी कारवाई केली. आयकर विभागाच्या टीमने जवळपास 12 ठिकाणांवर सर्च ऑपरेश सुरु केलं आहे.. जाणून घ्या नेमकं काय झालंय...

बॉलिवूडला दणका! रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे; सिनेमांच्या आड पैशांचा खेळ उघड?
Rakul Preet Singh
| Updated on: Sep 28, 2026 | 1:20 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीवर पुन्हा आयकर विभागाने छापे टाकल्यामुळे इंडस्ट्रीला मोठा दणका बसला आहे. मुंबई आयकर विभागाच्या टीमने टॅक्स चोरी आणि सिनेमाच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्या प्रकरणी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन हाऊसवर मोठी कारवाई सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, दिग्गज दिग्दर्शक वासू भगनानी आणि पॅनोरमा स्टूडीओ संबंधी 12 ठिकाणांवर सर्च ऑपरेश सुरु करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाला गेल्या काही दिवसांपासून माहिती मिळत होती की, सिनेमाचं शुटिंग, परदेशातील वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम परदेशात पाठवली जात आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर करचोरी आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यासंदर्भात, मुंबईतील प्राप्तिकर विभागाची विविध पथके मुंबईतील अनेक कार्यालये आणि परिसरांमध्ये तपासणी करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

आयकर विभागाच्या रडारवर आलेले सेलिब्रिटी…

रकूलप्रीत सिंग – बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री…

वासू भगनानी – ‘पूजा एंटरटेनमेंट’ या बॅनरखाली अनेक मोठे बॉलीवूड सिनेमे निर्मित करणारे एक नामांकित निर्माते.

पॅनोरामा स्टुडिओज –  ‘दृश्यम’ फ्रँचायझीसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती करणारी एक प्रमुख निर्मिती संस्था.

सध्या आयकर विभागाची चौकशी सुरुच आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आयकर विभाग पैशांच्या हेराफेरीबद्दल सांगतिल… असं मानलं जात आहे.

अभिनेत्री रकूल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रकुल हिने 2009 मध्ये दाक्षिणात्या सिनेमात पदार्पण करत अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दे दे प्यार दे’, ‘डॉक्टर जी’, ‘पती पत्नी और वो दो’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडिावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियार पोस्ट करते. पण आता अभिनेत्री वादाच्या भेवऱ्यात अडकली आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल