AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandira Bedi : राज कौशल यांच्या मृत्यूनंतर मंदिरा बेदीनं उचललं ‘हे’ पाऊल, पतीच्या जाण्यानं कोसळला दु:खाचा डोंगर

राज गेल्यानंतर मंदिरानं आता तिच्या इन्स्टाग्रामवर काही बदल केले आहेत. तिनं तिचा प्रोफाइल फोटो काढून काळ्या रंगाचा फोटो ठेवला आहे. (After Raj Kaushal's death Mandira Bedi took this step, changes her instagram dp )

Mandira Bedi : राज कौशल यांच्या मृत्यूनंतर मंदिरा बेदीनं उचललं 'हे' पाऊल, पतीच्या जाण्यानं कोसळला दु:खाचा डोंगर
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचा 30 जून रोजी मृत्यू झाला. राज यांच्या जाण्यानं मंदिरा आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी राज यांच्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. राज गेल्यानंतर मंदिरानं आता तिच्या इन्स्टाग्रामवर काही बदल केले आहेत. तिनं तिचा प्रोफाइल फोटो काढून काळ्या रंगाचा फोटो ठेवला आहे.

Mandira Bedi

ट्विटरवर मात्र तिचा जुना फोटो आहे. राजचा फोटो शेअर करताना मंदिराची मैत्रीण मौनी रॉयनं लिहिलं की, आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय आणि आता काहीही आधीसारखं राहणार नाही.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मंदिरा आणि राज यांची मुलंही प्रार्थना सभेला आली होती. राज आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करत होते. तो त्यांच्याबरोबर सोशल मीडियावर नेहमीच फोटोही शेअर करायचे. गेल्या वर्षीच राज आणि मंदिरानं त्यांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं.

मंदिरानं उचलली पतीची अर्थी

राज यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना मंदिरानं अर्थी उचलली होती. प्रत्येकजण मंदिराच्या त्या निर्णयाचं कौतुक करत असताना काही लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करत होते. अशा वेळी मंदिराला जीन्स टॉप घालण्याची गरज नव्हती, अशीही काहींची प्रतिक्रिया होती.

असं असताना अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी मंदिराला पाठिंबा दर्शविला आहे. गायिका सोना महापात्रा यांनी ट्वीट केलं की, ‘लोक अजूनही मंदिरा बेदीच्या ड्रेस कोडबद्दल बोलत आहेत. यात काही नवीन नाही कारण आपल्या समाजात जास्त मूर्खपणा आहे. श्वेता तिवारीनंही इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, मंदिरा, आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत. तू प्रेम काय आहे हे दाखवलं याचा अभिमान आहे.

कोण होते राज कौशल

राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माते होते. राज यांनी 2 चित्रपट दिग्दर्शित केले आणि 3 चित्रपटांची निर्मिती केली आहे. राजनं अँथनी कौंन है, प्यार में कभी कभी और शादी का लड्डू अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच वेळी त्यांनी बेखुदी चित्रपटातील स्टंट दिग्दर्शित केले.

संबंधित बातम्या

Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर-किरणचा घटस्फोट फातिमा शेखमुळे?, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता, ‘या’ कलाकारांच्या नावांची चर्चा

Photo : फातिमा सना शेखमुळे आमिर-किरणचा घटस्फोट !, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....