AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Setu | अक्षय कुमार ‘राम सेतू’च्या टीमसह अयोध्येला रवाना, ‘रामलला’चे दर्शन घेऊन करणार चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता सुट्टीचा आनंद साजरा केल्यानंतर पुन्हा कामावर परतला आहे. तो त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाला आहे.

Ram Setu | अक्षय कुमार ‘राम सेतू’च्या टीमसह अयोध्येला रवाना, ‘रामलला’चे दर्शन घेऊन करणार चित्रीकरणाचा श्रीगणेशा!
राम सेतु टीम
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 18, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता सुट्टीचा आनंद साजरा केल्यानंतर पुन्हा कामावर परतला आहे. तो त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाला आहे. आज (18 मार्च) अक्षय, नुसरत भरुचा (Nushrratt bharucha) आणि जॅकलिन फर्नांडिस (jacqueline Fernandez) यांच्यासमवेत अयोध्येला रवाना झाला आहे. हे तिघेही खासगी विमानाने मुंबईतून अयोध्याला रवाना झाले आहेत. अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे (Akshay Kumar leave for ayodhya  along with Ram Setu team and Actress jacqueline Fernandez, Nushrratt bharucha).

अक्षय त्याच्या टीमसह मुहूर्त शॉटसाठी सज्ज झाला आहे. त्याने जॅकलिन आणि नुसरत यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘एक खास चित्रपट, एक खास सुरुवात. राम सेतु मुहूर्त शॉटसाठी टीम अयोध्याला रवाना झाली आहे. हा प्रवास सुरू झाला आहे आणि आपणा सर्वांना तुमच्या शुभेच्छा आवश्यक आहेत.’

पाहा अक्षयचे ट्विट

(Akshay Kumar leave for ayodhya  along with Ram Setu team and Actress jacqueline Fernandez, Nushrratt bharucha)

असे दिसले कलाकार!

अक्षय कुमार विमानतळावर अगदी कूल लूकमध्ये दिसला होता. त्याने ब्लॅक शर्टसह राखाडी ट्राऊझर परिधान केली होती. तर, त्याचवेळी नुसरत आणि जॅकलिन व्हाईट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. जॅकलिनने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला होता आणि नुसरतने पांढऱ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेससह रंगीबेरंगी श्रग आणि सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली होती.

अयोध्येत होणार चित्रीकरण

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटात अक्षय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. अक्षयच्या चाहत्यांना ‘राम सेतु’मधील त्याचा नवा लूक आणि नवे पात्र लवकरच पाहायला मिळणार आहे (Akshay Kumar leave for ayodhya  along with Ram Setu team and Actress jacqueline Fernandez, Nushrratt bharucha).

दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा

जेव्हा, अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले तेव्हा त्यांने लिहिले होते की, ‘ही दिवाळी म्हणजे भारत राष्ट्राचा आदर्श आणि भगवान श्रीरामाची महान स्मृती, येणाऱ्या युगांपर्यंत भारतीय संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चला सगळ्या पिढ्यांना रामाशी जोडूया. या प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्पही आहे, ‘राम सेतु’, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

(Akshay Kumar leave for ayodhya  along with Ram Setu team and Actress jacqueline Fernandez, Nushrratt bharucha)

हेही वाचा :

Video | ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर थिरकण्यासाठी पूजा सावंतने घेतली ‘इतकी’ मेहनत, पाहा व्हिडीओ…

Khatron Ke Khiladi 11 | ‘बिग बॉस’नंतर रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’मध्ये दिसणार ‘कांटा लगा’ गर्ल!

Follow Us
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
CSMT स्थानकाबाहेर महागाईविरोधात सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी नेत्यांचे आंदोलन
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर