Khatron Ke Khiladi 11 | ‘बिग बॉस’नंतर रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’मध्ये दिसणार ‘कांटा लगा’ गर्ल!

लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवाला ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये स्टंट करताना दिसू शकते. वास्तविक अशी माहिती समोर येत आहे की, शोच्या टीमच्या वतीने शेफालीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून शेफालीनेही यात रस दाखवला होता.

Khatron Ke Khiladi 11 | ‘बिग बॉस’नंतर रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’मध्ये दिसणार ‘कांटा लगा’ गर्ल!
शेफाली जरीवाला

मुंबई : ‘बिग बॉस’ नंतर आता ‘खतरों के खिलाडी’चे 11वे (khatron ke khiladi) पर्व सुरू होणार आहे, ज्याचे चाहते बरीच प्रतीक्षा करत होते. जेव्हापासून, या शोची बातमी येते आहे, तेव्हापासून या शोविषयी अपडेट येतच असतात. या हंगामातील स्पर्धकांसाठी काही दिवसांपासून काही सेलेब्रिटींची नावे समोर येत असून, त्यात ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे (Shefali Jariwla) नाव समोर आले आहे (Actress Shefali Jariwla will participate khatron ke khiladi).

लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवाला ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये स्टंट करताना दिसू शकते. वास्तविक अशी माहिती समोर येत आहे की, शोच्या टीमच्या वतीने शेफालीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून शेफालीनेही यात रस दाखवला होता. तथापि, अद्याप काही फायनल झाले नाहीत. मात्र, जर अटी-शर्थी मान्य झाल्या तर, लवकरच शेफाली यात दिसणार आहे.

उर्वशी ढोलकियाही होणार सहभागी!

काही दिवसांपूर्वी उर्वशी ढोलकियाचे नावही या कार्यक्रमासाठी समोर आले होते. अशीही बातमी होती की उर्वशीने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि या शोमध्ये काम करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. ती खूप व्यायाम करत आहे. ‘बिग बॉस 6’ आणि ‘नच बलिये 9’मध्ये भाग घेतल्यानंतर उर्वशीला असे काहीतरी करायचे आहे, ज्यात ती स्वतःला आव्हान देऊ शकेल. अशा परिस्थितीत ‘खतरों के खिलाडी 11’ तिच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचे सिद्ध होऊ शकते. यामुळे तिने या शोला सहमती दर्शवली आहे (Actress Shefali Jariwla will participate khatron ke khiladi).

कधी होणार शो सुरु!

या शोचे शूटिंग एप्रिल किंवा मेमध्ये सुरू होईल आणि जूनमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा शो 3 महिने चालणार आहे. हा शो संपल्यानंतर बिग बॉसचा पुढील सीझन सुरू होणार आहे.

प्रत्येक वेळी या कार्यक्रमाचे विदेशात शूटिंग झाले होते. परंतु, कोव्हिडमुळे निर्माते कार्यक्रमाच्या जागेबद्दल अजूनही थोडेसे गोंधळलेले आहेत. ते शूटिंगसाठी सुरक्षित असलेल्या ठिकाणचे शोध घेत आहेत, कारण या शोसाठी खूप मोठी टीम आहे. तर, प्रत्येकाची सुरक्षितता पाहून, स्थान निश्चित केले जाईल. तसेच, कदाचित या वेळी शो मागील हंगामाप्रमाणे बल्गेरियातही असू शकेल.

रोहित शेट्टीच करणार होस्ट!

या हंगामात रोहित शेट्टीच कार्यक्रम होस्ट करणार आहेत. गेल्या काही सीझनपासून रोहित हा शो सतत होस्ट करत आहे. वृत्तानुसार, हा शो जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरूवातीला होऊ शकेल. हा शो जुलैपूर्वी सुरू होत असला, तरी कोव्हिडमुळे यावेळेस कार्यक्रमाला उशीर झाला आहे.

(Actress Shefali Jariwla will participate khatron ke khiladi)

हेही वाचा :

Marathi Movie : आर्ची दाखवणार ‘आठवा रंग प्रेमाचा’, नव्या चित्रपटाची घोषणा

विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI