AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडलाय अर्जुन कपूर, कौतुक करत म्हणाला ‘तिने मला खूप काही शिकवले’…

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडलाय अर्जुन कपूर, कौतुक करत म्हणाला ‘तिने मला खूप काही शिकवले’...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 27, 2021 | 10:32 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नव्हते, परंतु आता दोघेही एकमेकांबद्दल उघडपणे बोलतात. सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. आता अलीकडेच एका मुलाखतीत अर्जुनने मलायकाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मलायकाकडून आपल्याला दररोज काहीना काही शिकायला मिळत असल्याचेही त्याने म्हटले आहे (Arjun Kapoor says Malaika Arora is a talented actress and I learn so much from her).

अर्जुन म्हणाला, ‘मलायका कशी दमदार आहे हे मला आवडते. तिचे आयुष्य जगण्याचा मार्ग खूपच प्रभावी आहे. तिने वयाच्या 20व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली आणि अजूनही ती काम करत आहे. ती एक स्वतंत्र स्त्री आहे आणि तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी कधीही तिला कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करताना पाहिले नाही. मी कधीही तिला नकारात्मक झालेले पाहिले नाही, किंवा तिच्या जीवनावर नकारात्मकपणा येऊ देखील दिला नाही. ती नेहमीच अभिमानाने जगते आणि प्रत्येकाला आपल्या कामातून उत्तर देते. मी दररोज तिच्याकडून काहीतरी शिकत आहे.’

मलायका त्याच्यासाठी का आहे खास?

काही दिवसांपूर्वी चाहत्यांनी अर्जुनला मलायकाबद्दल विचारले की, मलायका इतर लोकांपेक्षा वेगळी आहे, असे तुम्हाला वाटते का? तर अर्जुन म्हणाला होते, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही अशा प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत. तसे, मलायकाची खास गोष्ट म्हणजे ती मला समजते आणि माझ्याबरोबर संयमाने सगळ्या गोष्टी हाताळते. जर माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर जगणे कठीण असेल, तरीही ती माझ्यासोबत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे.’(Arjun Kapoor says Malaika Arora is a talented actress and I learn so much from her)

मलायकाशी लग्न कधी करणार?

मलायकासोबतच्या लग्नाबद्दल अर्जुनला विचारले असता त्याने उत्तर दिले की, ‘जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगेन. सध्या लग्नाची कोणतीही योजना नाही. जरी मी लग्नाची योजना आखत असेन, तरी कोरोनासारख्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मी ते करणार नाही. आम्ही दोघांनी अद्याप लग्नाबद्दल विचार केलेला नाही. परंतु, मी असे म्हणेन की जेव्हा आम्ही लग्न करू, तेव्हा मी नक्कीच सर्वांना सांगेन. आम्हाला कोणापासूनही काही लपवायचे नाही.’

अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तो आता ‘सरदार का ग्रँडसन’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुनबरोबर रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे अर्जुन आणि रकुल पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

(Arjun Kapoor says Malaika Arora is a talented actress and I learn so much from her)

हेही वाचा :

‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते? जाणून घ्या ‘आर्ची’ची मैत्रीण साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल…

भावा-भावांमध्ये निर्माण झाली दरी, बॉलिवूडकरांना सुनावल्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाचा पलटवार! म्हणाला…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?