AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावा-भावांमध्ये निर्माण झाली दरी, बॉलिवूडकरांना सुनावल्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाचा पलटवार! म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनी जे सेलिब्रिटी मालदीवमध्ये फिरायला गेले होते आणि ज्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, त्या सेलिब्रेटींची चांगलीच कान उघडणी केली होती.

भावा-भावांमध्ये निर्माण झाली दरी, बॉलिवूडकरांना सुनावल्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाचा पलटवार! म्हणाला...
नवाजुद्दीन आणि शम्स
| Edited By: | Updated on: Apr 27, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रेटी सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवला गेले आहेत. मुंबईत शूटिंग बंद आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येक सेलिब्रेटी कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत होते. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनी जे सेलिब्रिटी मालदीवमध्ये फिरायला गेले होते आणि ज्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, त्या सेलिब्रेटींची चांगलीच कान उघडणी केली होती. मात्र, आता असे दिसते आहे की, नवाजचा भाऊ शम्स (Shamas siddiqui) याला नवाजचे हे म्हणणे आवडलेले नाही आणि त्याने याप्रकारणावरून नवाजुद्दीनवर टीका केली आहे (Nawazuddin Siddiqui brother Shamas siddiqui slams actor over Maldives vacation).

नवाजचा भाऊ शम्स यांनी एका लोकप्रिय डिजिटल पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, ‘भाई नवाज, तू इतका का रागावला आहेस? प्रत्येकाला कुठेही फिरण्याचा हक्क आहे. सर्वजण कर भरतात आणि तूही कर भरतोस. तू आतापर्यंत समाजासाठी काय केले ते आधी सांग. उगाच आता चांगले बनण्याचा प्रयत्न करू नकोस.’

शम्स याच्या या वक्तव्यानंतर असे दिसून येते की, दोन्ही भावांमध्ये कशावरून तरी वाद सुरू आहे. शम्स आणि  नवाज मधील हे तणावपूर्वक संबंध नवी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतील असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

मालदीवमध्ये पोहोचले बॉलिवूडकर

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबईतील लॉकडाऊन वाढताच बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स कामातून ब्रेक घेत मालदीवला रवाना झाले आहेत. या यादीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, सारा अली खान यांचा समावेश आहे. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सुट्टीवर मालदीवमध्येही पोहोचले होते. त्याचवेळी श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ प्रियांक शर्माचे काही दिवसांपूर्वीच मालदीवमध्ये लग्न झाले होते (Nawazuddin Siddiqui brother Shamas siddiqui slams actor over Maldives vacation).

काय म्हणाला नवाज?

कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी मालदीवमध्ये जाऊन व्हेकेशन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने, त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. ट्विटरवर या बॉलिवूड सेलेब्सनाही ट्रोल केले गेले होते. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही काही दिवसांपूर्वी या संदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने सेलेब्रिटींवर टीका केले होती. ते म्हणाले, ‘या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनविला आहे. पर्यटन उद्योगाशी त्यांचे काय संबंध आहे हे मला माहित नाही. परंतु माणुसकी म्हणून या सुट्ट्या केवळ आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवा. येथे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. कोरोनाची प्रकरणे कैक पटींनी वाढत आहेत. ज्यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून त्यांचा अपमान करू नका.’

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, ‘आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे मोठे झाले पाहिजे. जर बरेच लोक आपले अनुसरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’ नवाजला, तुम्ही कधी मालदीवला जात आहात? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘बिलकुल नाही, मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासमवेत आहे. हेच माझे मालदीव आहे.

(Nawazuddin Siddiqui brother Shamas Siddiqui slams actor over Maldives vacation)

हेही वाचा :

Oscars 2021 | नोमॅडलँडसाठी Chloe Zhao यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर, इतिहासातील दुसरीच महिला दिग्दर्शक

बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण…

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....