बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण…

पुन्हा एकदा जेव्हा मुंबईत शूटिंग थांबले, तेव्हा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बॉलिवूड स्टार्स मालदीवमध्ये व्हेकेशन ट्रीपसाठी गेले होते. पण, आता या पुढे हे स्टार्स मालदीवमध्ये जाऊ शकणार नाहीयत.

बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण...
बॉलिवूड कलाकार
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 10:35 AM

मुंबई : मालदीव बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी सुट्टीचे सर्वोत्तम ठिकाण बनले आहे. बरेच कलाकार आपली बॅग पॅक करून आणि कामापासून मुक्त होताच मालदीवला रवाना झाले होते. गेल्या वर्षी लॉकडाउन उघडल्यावर अनेक कलाकार एकाच वेळी मालदीवमध्ये पोहोचले, तेव्हापासून मालदीवमध्ये बॉलिवूड सेलेब्सची वर्दळ वाढते आहे. आता पुन्हा एकदा जेव्हा मुंबईत शूटिंग थांबले, तेव्हा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बॉलिवूड स्टार्स मालदीवमध्ये व्हेकेशन ट्रीपसाठी गेले होते. पण, आता या पुढे हे स्टार्स मालदीवमध्ये जाऊ शकणार नाहीयत (Maldives government takes serious decision suspend indian tourist due to corona pandemic).

मालदीवमध्ये नो एन्ट्री!

वास्तविक, मालदीवमधील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मालदीवने सुट्टीसाठी भारतातून येणार्‍या प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलेब्स देखील आता मालदीवमध्ये जाऊ शकणार नाहीयत. पूर्वी मालदीवमध्ये गेलेले सेलेब्सही आता तेथून भारतात परत येत आहेत.

मालदीवमध्ये पोहोचले बॉलिवूडकर

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबईतील लॉकडाऊन वाढताच बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स कामातून ब्रेक घेत मालदीवला रवाना झाले आहेत. या यादीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, सारा अली खान यांचा समावेश आहे. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सुट्टीवर मालदीवमध्येही पोहोचले होते. त्याचवेळी श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ प्रियांक शर्माचे काही दिवसांपूर्वीच मालदीवमध्ये लग्न झाले होते (Maldives government takes serious decision suspend indian tourist due to corona pandemic).

बॉलिवूडकरांवर टीकेची झोड

कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी मालदीवमध्ये जाऊन व्हेकेशन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने, त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. ट्विटरवर या बॉलिवूड सेलेब्सनाही ट्रोल केले गेले होते. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही काही दिवसांपूर्वी या संदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने सेलेब्रिटींवर टीका केले होती. ते म्हणाले, ‘या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनविला आहे. पर्यटन उद्योगाशी त्यांचे काय संबंध आहे हे मला माहित नाही. परंतु माणुसकी म्हणून या सुट्ट्या केवळ आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवा. येथे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. कोरोनाची प्रकरणे कैक पटींनी वाढत आहेत. ज्यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून त्यांचा अपमान करू नका.’

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, ‘आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे मोठे झाले पाहिजे. जर बरेच लोक आपले अनुसरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’ नवाजला, तुम्ही कधी मालदीवला जात आहात? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘बिलकुल नाही, मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासमवेत आहे. हेच माझे मालदीव आहे.

(Maldives government takes serious decision suspend indian tourist due to corona pandemic)

हेही वाचा :

Oscars 2021 | नोमॅडलँडसाठी Chloe Zhao यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर, इतिहासातील दुसरीच महिला दिग्दर्शक

Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.