Aryan Khan Drugs Case | पाण्यात बुडवून खावं लागतंय बिस्कीट, 100 कैद्यांच्या गर्दीत झोपण्याचा प्रयत्न करतोय आर्यन खान!

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या ड्रग्स प्रकरणात जामीन अर्जावर आज (20 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालय आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज निकाल देऊ शकते.

Aryan Khan Drugs Case | पाण्यात बुडवून खावं लागतंय बिस्कीट, 100 कैद्यांच्या गर्दीत झोपण्याचा प्रयत्न करतोय आर्यन खान!
Aryan Khan

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या ड्रग्स प्रकरणात जामीन अर्जावर आज (20 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालय आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज निकाल देऊ शकते. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे, ती ऐकून शाहरुख खानचे चाहते निद्रिस्त होऊ शकतात. आलिशान जीवन जगणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन आता 100 कैद्यांसोबत आर्थर रोड जेलच्या बॅरेकमध्ये झोपण्याचा प्रयत्न करतो आहे.

एवढेच नाही तर, दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार आर्यन खान तुरुंगात गेल्यापासून त्याने फक्त एक दिवसच जेलचा चहा प्यायला आहे. तेव्हापासून तो फक्त बिस्किटे आणि चिप्स खात आहे. चहा नाकारून तो बिस्किटे पाण्यात बुडवून खातो वाहे. कारागृहातील आर्यन खानची ही स्थिती त्याच कारागृहातील आणखी एका कैद्याने सांगितली आहे, जो नुकताच तुरुंगाबाहेर आला आहे.

100 कैद्यांच्या गर्दीत आर्यन खानचा दिवस!

अहवालानुसार, आर्यन सोबतचा हा कैदी 16 ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटला होता. आर्यन खानबद्दल बोलताना, त्यानेने सांगितले की, जेव्हा आर्यन खान तुरुंगात आला, फक्त त्याच दिवशी त्याने जेलचा चहा प्यायला, जो त्याने शाहरुख खानच्या मुलाला दिला होता. तेव्हापासून आर्यन खान फक्त चिप्स आणि बिस्किटे खात आहे. तो पाण्यामध्ये बुडवून बिस्किट खातो. मात्र, तुरुंगात दिले जाणारे पाणी अजिबात पीत नाही. तो फक्त सीलबंद बाटलीमधून पाणी पितो.

तसेच तो म्हणाला की, या व्यतिरिक्त इतर कैद्यांप्रमाणे आर्यन खान तिथे दिलेले कपडे घालत नाही. त्याने तेच कपडे घातले आहेत, जे त्याच्या पालकांनी त्याला घरून पाठवले होते. तो 4500 रुपयांच्या मनीऑर्डरने फक्त पाणी, बिस्किटे आणि चिप्स खरेदी करतो. त्याने असाही दावा केला आहे की, आर्यनला त्याने आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा जेवण खाण्यास सांगितले होते, पण त्याने प्रत्येक वेळी नकारच दिला. तो भूक लागत नाही असे म्हणायचा. तो कैद्यांना पुरवले जाणारे अन्न नक्कीच घेतो, पण इतर कैद्यांना वाटून टाकतो.

व्हीआयपी वागणूक नाहीच!

शाहरुख खानचा मुलगा असल्याने आर्यन खानला तुरुंगात व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, हा कैदी ही बाब पूर्णपणे नाकारतो. तो म्हणतो की, आर्यन खान त्याच बॅरॅकमध्ये राहतो जिथे 100 लोक एकत्र राहतात. कारागृहात 4 बॅरेक्स आहेत, ज्यात 100-100 कैदी ठेवण्यात आले आहेत. या बॅरेकमध्ये 10 पंखे आहेत. आर्यन खानला इतर कैद्यांप्रमाणे एकमेकांना लागून असलेल्या बॅरेकमध्ये झोपावे लागते. आर्यन खान एकटाच तुरुंगात बसतो आणि तो कोणाशी बोलत नाही. तो तुरुंगात खूप अस्वस्थ आहे. विशेषत: जेव्हा त्याचे केस कापले गेले आणि त्याची शेव्हिंग करण्यात आली होती.

हेही वाचा :

‘Sardar Udham’ची मेहनत दाखवताना विकी कौशलने शेअर केला पाठीवरच्या वळांचा फोटो, चाहतेही झाले स्तब्ध!

Happy Birthday Kiran Kumar | प्रसिद्ध खलनायकाचा मुलगा, चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर टीव्ही विश्वाचे स्टार बनले किरण कुमार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI