Happy Birthday Kiran Kumar | प्रसिद्ध खलनायकाचा मुलगा, चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर टीव्ही विश्वाचे स्टार बनले किरण कुमार!

अभिनेता किरण कुमार (Actor Kiran Kumar) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. चित्रपट असो किंवा टीव्ही, त्यांनी तितकेच योगदान दिले. 20 ऑक्टोबर 1953 रोजी मुंबईत जन्मलेले, किरण कुमार यांचे वडील जीवन कुमार हे एक ज्येष्ठ अभिनेते होते.

Happy Birthday Kiran Kumar | प्रसिद्ध खलनायकाचा मुलगा, चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर टीव्ही विश्वाचे स्टार बनले किरण कुमार!
Kiran Kumar
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 10:26 AM

मुंबई : अभिनेता किरण कुमार (Actor Kiran Kumar) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. चित्रपट असो किंवा टीव्ही, त्यांनी तितकेच योगदान दिले. 20 ऑक्टोबर 1953 रोजी मुंबईत जन्मलेले, किरण कुमार यांचे वडील जीवन कुमार हे एक ज्येष्ठ अभिनेते होते. किरण कुमार यांचे वडील भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम खलनायकांपैकी एक मानले जातात.

लहानपणापासूनच ते मनोरंजन विश्वातील कौटुंबिक नात्यांमुळे चित्रपटसृष्टीत वाढले. चित्रपटात येण्यापूर्वी ते थिएटर करायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरमध्ये झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी आरडी नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांचा अभिनयाकडे कल वाढू लागला आणि म्हणून त्यांनी पुढे पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या ओळखीचा वापर करत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

टीव्ही स्टार म्हणूनही नावाजले!

किरण कुमारने ‘दो बूंद पानी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ते ‘चालाक’, ‘अपराधी’, ‘आज़ाद मोहब्बत’, ‘मिस्टर रोमियो’, ‘कालाबाजार’, ‘महादेव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसले. जेव्हा त्यांनी चित्रपटांमधून टीव्हीच्या जगात प्रवेश केला, तेव्हा ते तेथेही त्यांच्या सामर्थ्याने काही काळानंतर टीव्हीचे स्टार बनले. किरण कुमारने अनेक मुलाखती दरम्यान म्हटले होते की, तो कधीही त्याच्या वडिलां इतके मोठे अभिनेता बनू शकणार नाही. वडिलांसारखा अभिनेता चित्रपटसृष्टीसाठी वरदान आहे.

अभिनेता किरण कुमार यांची पत्नी सुषमा शर्मा देखील एक गुजराती अभिनेत्री आहेत. त्यांना दोन मुले आहेत, मुलाचे नाव शौर्य आणि मुलीचे नाव सृष्टी. दोन्ही मुले मनोरंजनाच्या दुनियेत आपली छाप पाडण्यात व्यस्त आहेत.

गुजराती चित्रपटांमध्येही केले काम!

किरण कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत राकेश रोशनच्या ‘खुदगर्ज’ या चित्रपटाद्वारे आपला ठसा उमटवला. या चित्रपटात ते खलनायक बनले होते. तेव्हापासून, नायकासह, त्यांना खलनायकाच्या पात्रांसाठी देखील ओळखले गेले. यानंतर, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘तेजाब’, ‘आज की आग’, ‘धडकन कैसी’ या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटांबरोबरच ते गुजराती चित्रपट आणि टीव्ही सीरियल्समध्येही खूप सक्रिय होते. त्यांनी ‘जिंदगी’, ‘घुटन’, ‘शपथ’, ‘साहिल’, ‘कथा सागर’, ‘आर्यमन’, ‘एहसास’, ‘पृथ्वी वल्लभ’ आणि ‘मंझिल’ इत्यादी काही लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

हेही वाचा :

अमीश त्रिपाठी लिखित ‘भगवान शिवा’च्या जीवनावरील सुप्रसिद्ध कादंबरी आता ऑडिओबुक्स स्वरूपात!

Top 5 Web Series |  ‘मनी हाईस्ट’ ते ‘स्क्विड गेम’, ओटीटीवरील वेब सीरीज करतील दिवसभर मनोरंजन!

Mouni Roy : मोनोक्रोम फोटोंमध्ये मौनी रॉयचा जबरदस्त लूक, किलर पोज देत केलं फोटोशूट

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.