AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!

‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan)  यांचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) 2 सप्टेंबरपासून आपल्या घरी परतलेला नाही. ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरल्याने तो सध्या तुरुंगाची हवा खात आहे.

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!
Khan Family
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 3:47 PM
Share

मुंबई : ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan)  यांचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) 2 सप्टेंबरपासून आपल्या घरी परतलेला नाही. ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरल्याने तो सध्या तुरुंगाची हवा खात आहे. दरम्यान, आर्यनच्या सुटकेसाठी त्याच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आर्यन खानला अद्याप जामीन मिळवता आलेला नाही. आर्यन खानचे आई-वडील शाहरुख खान आणि गौरी खानच्या मुलाच्या काळजीत झोपत देखील नाहीयत. संपूर्ण घरात तणावाचे वातावरण आहे. खान कुटुंबात कोणताही सण किंवा वाढदिवस साजरा केला जात नाही. प्रत्येकजण आर्यन खान घरी परतण्याची वाट पाहत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी खानने तिच्या घरातील स्वयंपाकघर कर्मचाऱ्यांना स्पष्ट आदेश दिला आहे की, जोपर्यंत तिचा मुलगा आर्यन खान तुरुंगातून सुटत नाही, तोपर्यंत स्वयंपाकघरात काहीही गोड पदार्थ शिजवले जाणार नाही.

यंदा सेलिब्रेशन नाही!

इंडिया टुडेने एका स्रोताच्या हवाल्याने म्हटले आहे की, शाहरुख आणि गौरी सध्या कोणत्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाहीत. ईद आणि दिवाळीच्या निमित्ताने मन्नतची इमारत नेहमी वधूसारखी सजवली जायची. पण यावेळी असं काहीही दिसणार नाहीय.

गौरीने तिच्या स्टाफसाठी हा आदेश जारी केला आहे की, आर्यनच्या सुटकेपर्यंत स्वयंपाकघरात काहीही गोड अन्न बनवले जाणार नाही. इनसाइडरने इंडिया टुडे डॉट इनला इनला सांगितले की, दरम्यान एक घटना घडली जेव्हा गौरीला कळले की, लंच मेनूमध्ये खीर तयार केली जात आहे. यानंतर, गौरी खानने ताबडतोब कर्मचाऱ्यांना खीर बनवणे बंद करायला लावले आणि प्रत्येकाला आदेश दिला की, जोपर्यंत त्यांचा मुलगा आर्यन याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत या स्वयंपाकघरात मिठाई बनवली जाणार नाही.

आई-वडील चिंतेत

गौरीने नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या मुलाच्या सुटकेसाठी व्रत आणि विशेष व्रत ठेवल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, सध्या गौरी खान खूप अस्वस्थ आहे आणि तिच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आर्यनच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत आहे.

त्याचबरोबर मन्नतमध्ये ज्या पद्धतीने सेलेब्सची सतत ये-जा होत होती. हे पाहून शाहरुख खानने सेलेब्सना मन्नतवर येणे जाणे कमी करण्याचे आवाहन केले. तो सतत त्याच्या मित्रांशी फोनवर बोलत असतो.

लवकरच निर्णय येण्याची शक्यता!

आर्यन खानबद्दल बोलायचे तर, 20 ऑक्टोबर रोजी स्टारकिडच्या जामिनावर पुन्हा सुनावणी होईल. गेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आता आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय 20 तारखेला होणार आहे. प्रत्येकजण न्यायाधीशांच्या निकालाची वाट पाहत आहे.

हेही वाचा :

‘रोमान्स किंग’ शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करण्यास समंथाचा नकार? जाणून घ्या नेमकं कारण…

Dhamaka Trailer : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दिसणार सस्पेन्स-थ्रिलरची जादू…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.