AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhamaka Trailer : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दिसणार सस्पेन्स-थ्रिलरची जादू…

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आता त्या कलाकारांच्या यादीत आला आहे, ज्यांचे सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग जमली आहे. कार्तिक पुन्हा एकदा आपल्या पुढच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देण्यासाठी सज्ज झाला आहे.

Dhamaka Trailer : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दिसणार सस्पेन्स-थ्रिलरची जादू...
Kartik Aaryan
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 1:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आता त्या कलाकारांच्या यादीत आला आहे, ज्यांचे सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग जमली आहे. कार्तिक पुन्हा एकदा आपल्या पुढच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ (Dhamaka) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कार्तिक आर्यन पत्रकार ‘अर्जुन पाठक’ बनून डिजिटल स्पेसमध्ये ‘धमाका’ करणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमका’ चा ट्रेलर आज (19 ऑक्टोबर) रिलीज झाला आहे, ज्यामध्ये कार्तिकच्या परिवर्तनाने चाहते थक्क झाले आहेत.

नवीन पात्रासह प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का

मनोरंजक गोष्ट म्हणजे, कार्तिक बऱ्याच काळापासून रोमँटिक-कॉमेडी स्पेसवर राज्य करत असताना, ‘धमाका’ त्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, ज्याने त्याच्या करिअरच्या आलेखात एक नवीन आयाम जोडला जाईल.

अभिनेत्याने त्याच्या व्यक्तिरेखेत येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. ‘धमाका’ मध्ये, कार्तिक एका न्यूज अँकरची भूमिका साकारतो आहे, ज्याला त्याच्या रेडिओ शोवर एक भयानक कॉल येतो आणि करिअरमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळते. तथापि, यासाठी  त्याला त्याच्या विवेकबुद्धीचा वापर करावा लागू शकतो.

या ट्रेलरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जिथे चाहते कार्तिकच्या अनुभवात्मक चित्रणाची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीयत. ट्रेलरमधील अभिनेत्याच्या लूकला खूप दाद मिळत आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या अभिनयालाही!

पाहा ट्रेलर :

या चित्रपटाची खास बाब म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग 10 दिवसात पूर्ण झाले आहे. 22 नोव्हेंबरला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. म्हणून हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करणार असल्याची बातमी मिळाली होती.

कोरियन चित्रपटाचा अधिकृत रीमेक

.या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. कोरियन चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’ चा हा अधिकृत रीमेक आहे. कार्तिक अर्जुन पाठक नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत आहे. कार्तिक व्यतिरिक्त मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि विश्वजित प्रधानही यात काम करत आहेत. धमाका चित्रपटाची निर्मिती राम मधवानी फिल्म्स, आरएसव्हीपी मूव्हीज, लोटी कल्चरवर्क्स, लायनगेट्स फिल्म्स आणि ग्लोबल गेट एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Vamika | अनुष्का शर्माने शेअर केला वामिका-विराटचा क्यूट फोटो, तुम्ही पाहिलात का?

‘घेतला वसा टाकू नको’मधून लाडकी ‘सुमी’ अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

‘झी मराठी अवॉर्ड्स 2021’मध्ये कतरीना कैफची हजेरी, कलाकारांच्या उपस्थितीत रंगला दिमाखदार सोहळा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.