AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vamika | अनुष्का शर्माने शेअर केला वामिका-विराटचा क्यूट फोटो, तुम्ही पाहिलात का?

आजकाल अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पती विराट कोहलीसोबत (Virat Kohli) दुबईत आहे. दुबईमध्ये टी-20 विश्वचषक सुरू झाला असून, विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का शर्मा तिथे पोहोचली आहे. अनुष्काने अलीकडेच तिच्या अलगीकरणा असलेल्या जीवनाची झलक चाहत्यांना दिली.

Vamika | अनुष्का शर्माने शेअर केला वामिका-विराटचा क्यूट फोटो, तुम्ही पाहिलात का?
Virat-Vamika
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : आजकाल अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पती विराट कोहलीसोबत (Virat Kohli) दुबईत आहे. दुबईमध्ये टी-20 विश्वचषक सुरू झाला असून, विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का शर्मा तिथे पोहोचली आहे. अनुष्काने अलीकडेच तिच्या अलगीकरणा असलेल्या जीवनाची झलक चाहत्यांना दिली. आता असे दिसतेय की, त्याचा अलगीकरणाचा कालावधी आता संपला आहे. तसेच, ती पती विराट आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) वेळ घालवत आहे.

अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक अतिशय क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट कोहली मुलगी वामिकासोबत दिसत आहे. फोटोत विराट वामिकासोबत हसत खेळताना दिसत आहे. वामिका बॉल पिटमध्ये बरेच चेंडू घेऊन बसली आहे. फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझे संपूर्ण हृदय एका फ्रेममध्ये.’

सेलेब्सनी दिली प्रतिक्रिया :

अनुष्काच्या या अत्यंत क्यूट पोस्ट चाहत्यांना खूप आवडत आहेत. तसेच, हे पाहून सेलेब्सदेखील अनेक प्रतिक्रिया देत आहेत. मसाबा गुप्ता, रकुल प्रीत सिंह, नीती मोहनसह इतरांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. सोशल मीडिया वापरकर्ते या फोटोला क्युट फोटो म्हणत हार्ट इमोजी शेअर करत आहेत.  याआधी, अनुष्का शर्माने विराट कोहलीचे अनेक फोटो शेअर केले आणि सांगितले की, ते दुबई हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये आहे. फोटोंमध्ये विराट हॉटेलच्या बाल्कनी आणि लॉनवर दिसत आहे. अनुष्काने या फोटोला ‘बबलवाली जिंदगी प्यार’, असे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विवाह इटलीच्या टस्कनी येथे झाला. 11 डिसेंबर 2017 रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. 11 जानेवारी 2021 रोजी दोघांनी मुलगी वामिकाचे जगात स्वागत केले. विराट सध्या ‘टी 20’ विश्वचषकात व्यस्त आहे. त्याचबरोबर अनुष्का शर्मा ‘काला’ चित्रपटाची निर्मिती करत आहे.

झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येत्या 4 ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडबरोबर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. WTC अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंना त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी जवळपास तीन आठवड्यांचा वेळ मिळाला. खेळाडू आपल्या कुटुंबासमवेत वेळ व्यतित करत आहे. विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्का आणि लेक वामिका देखील आहे. अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटापासून दूर आहे. शाहरुख खानबरोबर ‘जीरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता लवकरच प्रेक्षकांची ओढ संपणार आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाचे शूटिंग कधी?

बॉलिवूड हंगामा छापलेल्या रिपोर्टनुसार, बायोपिकच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. अशात 2021 संपण्याच्या अगोदर चित्रपटाचे शुटींग सुरु होणार नाही. 2022 च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरु होऊ शकतं, असा अंदाज आहे. अनुष्का सध्या विराटबरोबर इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे चित्रपटाचं शुटिंग लगोलग सुरु होण्याची कोणतही आशा नाहीय.

हेही वाचा :

‘घेतला वसा टाकू नको’मधून लाडकी ‘सुमी’ अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Nauheed Cyrasi Birthday : ‘पिया बसंती रे’ नंतर नौहिद ठरली अनेकांची क्रश; 21 वर्षांनंतरही आहेत सौंदर्याच्या चर्चा, फोटो पाहा

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.