अमीश त्रिपाठी लिखित ‘भगवान शिवा’च्या जीवनावरील सुप्रसिद्ध कादंबरी आता ऑडिओबुक्स स्वरूपात!

अमीश त्रिपाठी लिखित ‘भगवान शिवा’च्या जीवनावरील सुप्रसिद्ध कादंबरी आता ऑडिओबुक्स स्वरूपात!
Audio Books

भारतीय पुराणकथा, दंतकथा, लोककथा, देव, धर्म, संस्कृती,इतिहास, असुर आणि नायक इत्यादींच्या माध्यमातून लोकप्रिय कथा कादंबऱ्यांची निर्मितीकरून आजच्या तरुणाईच्या मनातलं ताईत झालेले लोकप्रिय लेखक अमिश त्रिपाठी यांची प्रचंड लोकप्रिय पुस्तके आता स्टोरीटेलवर आठ वेगवेगळ्या भाषांमधील ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध होत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 20, 2021 | 9:25 AM

मुंबई : भारतीय पुराणकथा, दंतकथा, लोककथा, देव, धर्म, संस्कृती,इतिहास, असुर आणि नायक इत्यादींच्या माध्यमातून लोकप्रिय कथा कादंबऱ्यांची निर्मितीकरून आजच्या तरुणाईच्या मनातलं ताईत झालेले लोकप्रिय लेखक अमिश त्रिपाठी यांची प्रचंड लोकप्रिय पुस्तके आता स्टोरीटेलवर आठ वेगवेगळ्या भाषांमधील ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध होत आहेत. यामध्ये ‘शिवा ट्रायलॉजी’, प्रभू श्रीरामचंद्रांवरील प्रदीर्घ मालिका आणि ‘इमॉर्टल इंडिया : यंग इंडिया’, ‘टाइमलेस सिव्हिलायझेशन आणि धर्म’: महाकाव्यातून अर्थपूर्ण आयुष्याचा कोडमंत्र सांगणाऱ्या या महाकादंबऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांनी विक्रीचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

ही पुस्तकं मराठी सोबतच गुजराती, बंगाली, तामिळ, तेलगु, कन्नडा, आसामी आणि मल्याळममध्ये भाषांतरित करण्यात आलेली असून फक्त स्टोरीटेलवरच ऐकता येणार आहे.

अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता!

स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या या उपक्रमाविषयी बोलताना लेखक अमिश त्रिपाठी म्हणतात की, “मी माझी पुस्तके केवळ इंग्रजीतच नव्हे, तर भारतीय भाषांमध्येही प्रकाशित करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. हिंदी, मल्याळम, मराठी, तामिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती, आसामी आणि छापील पुस्तकांच्या इतर आवृत्यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला याचा मला आनंद आहे. मला असे वाटते, आपल्या भारताने जितके लिखित दस्ताऐवज, कथा साहित्यासोबतच मौखिक कथांही तितकेच महत्व दिले आहे. स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या जादुई स्वरांमुळे माझी पुस्तके आठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील. कथा आणि ध्वनीचा सुरेख मिलाफ करून स्टोरीटेलने अप्रतिम ऑडिओबुक्सची निर्मिती केली असून रसिकांचा प्रतिसाद ऐकण्यासाठी मी विशेष उत्सुक आहे!”

संस्कृती आणि धर्मासोबत जोडलीये नाळ!

याबद्दल बोलताना योगेश दशरथ सांगतात, “अमीश यांच्या पुस्तकांनी आपल्या संस्कृती आणि धर्मासोबत आपली नाळ जोडली आहे. त्यांची पुस्तके विशेषत: आजच्या तरुणाईशी संवाद साधत अनेक पिढयांसोबत जोडण्याचे कौशल्य साधले आहे. स्टोरीटेलने त्यांची पुस्तके मराठीसह भारतातील आठ प्रमुख भाषांमधील ऑडिओबुक्समध्ये अनुवादित केली असून, त्यांच्या यशाबद्दल आम्ही विशेष उत्सुक आहोत. स्टोरीटेलची मूळ संकल्पना अमर्याद अविस्मरणीय ऑडिओबुक्स निर्मितीची असून ऑडिओबुक्स तुम्ही कधीही, कुठे आणि कितीही ऐकू शकत असल्याने नवनव्या उत्कृष्ट कथा स्टोरीटेलच्या चाहत्यांसाठी आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.”

स्टोरीटेल ही एक ऑडिओबुक आणि ईबुक अॅप स्ट्रीमिंग सेवा आहे, जी भारतात 27 नोव्हेंबर 2017 रोजी सुरू झाली. कंपनीचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडनमध्ये आहे आणि सध्या जगभरातील 25 देशांमध्ये कार्यरत आहे. भारतात, अॅप सध्या इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या 11 भारतीय भाषांमध्ये एकूण 2 लाखांहून अधिक ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत होणार सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदेंची एण्ट्री

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें