AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांग्याचं भरीत ते चिकन बिर्याणी… आशाताईंच्या आवडीचे 5 पदार्थ, वाचा…

Asha Bhosale Favorite Food : दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आशाताई स्वयंपाकातही पारंगत होत्या. आज आपण त्यांच्या आवडीच्या 5 पदार्थांची माहिती जाणून घेऊयात.

वांग्याचं भरीत ते चिकन बिर्याणी... आशाताईंच्या आवडीचे 5 पदार्थ, वाचा...
asha Bhosle 5 favorite dishesImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 12, 2026 | 4:37 PM
Share

दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोकककळा पसरली आहे. आज त्यांनी मुंबईत 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांनी जवळपास 70 वर्षांच्या कारकीर्दीत विविध भाषांमधील हजारो गाणी गायली. यासाठी त्यांनी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आशाताई स्वयंपाकातही पारंगत होत्या. तसेच त्यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचीही आवड होती. आज आपण त्यांच्या आवडीच्या 5 पदार्थांची माहिती जाणू घेणार आहोत.

थकवा दूर करण्यासाठी स्वयंपाक करायच्या

आशा भोसले यांनी हजारो गाणी गायली, पण स्वयंपाकाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. लग्नानंतर सासरी गेल्यावर हा छंद आणखी वाढला. त्यांनी दुबई आणि कुवैतमध्ये ‘आशा’ नावाची रेस्टॉरंट्सही सुरू केली, जिथे त्यांच्या खास रेसिपींवर उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. त्या म्हणायच्या की स्वयंपाक करणे म्हणजे त्यांचा थकवा घालवण्याचा मार्ग होता.

आशाताईंच्या आवडीचे पदार्थ

  • मिरचीचं लोणचं : आशाताईंनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की साधा भात, डाळ आणि मिरचीचं लोणचं हे त्यांचं सर्वात आवडतं जेवण होतं.
  • कढई गोश्त : आशा भोसले यांना कढई गोश्त खूप आवडत होतं. मटण प्रेशर कुकरमध्ये शिजवून कढईत कांदे परतून मसाले व टोमॅटो घालून हा पदार्थ बनवला जातो.
  • चिकन बिर्याणी : आशाताईंना चिकण बिर्याणीही खूप आवडायची. चिकनला मॅरिनेट करून, अर्धवट शिजलेल्या भातात ते ठेवून ही डिश तयार केली जाते.
  • शामी कबाब: चिकन किंवा मटण कीमा, चण्याची डाळ, मसाले आणि अंडी वापरून हे सॉफ्ट आणि स्वादिष्ट कबात तयार केले जातात.
  • हिरव्या वांग्याचं भरीत : हा पदार्थ त्यांच्या आईच्या आठवणींशी जोडलेला होता. वांगी भाजून सोलून मॅश करून मसाल्यात परतवून हा पदार्थ बनवला जातो.

रेस्टॉरंट चेनच्या आहेत मालक

खाण्याच्या याच आवडीतून त्यांनी अनेक रेस्टॉरंट्स उघडली, त्या रेस्टॉरंट चेनच्या मालक बनल्या. दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचं त्यांचं रेस्टॉरंट आहे. अबू धाबी, दोहा आणि बहरीनमध्येही त्यांची रेस्टॉरंट्स असून या रेस्टॉरंट्समध्ये प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. एवढंच नव्हे तर आशा भोसले यांनी स्वतः या रेस्टॉरंटमधील शेफना प्रशिक्षण दिलं होतं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा