AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber ​​Crime : राजकुमार रावच्या पॅनकार्डचा गैरवापर, कर्जही घेतलं, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती…

अभिनेता राजकुमार रावची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे

Cyber ​​Crime : राजकुमार रावच्या पॅनकार्डचा गैरवापर, कर्जही घेतलं, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती...
Image Credit source: राजकुमार राव इन्स्टाग्राम
| Updated on: Apr 02, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई : अलिकडच्या काळात सायबर क्राईमच्या (Cyber ​​Crime) संख्येत मोठी वाढ होत आहे. अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येतोय. याला बॉलिवूडमधील कलाकारही अपवाद नाहीत. कारण बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची (RajKummar Rao) फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. राजकुमारच्या पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या पॅनकार्डचा गैरवापर करून त्याच्या नावावर कर्जही काढण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकाराची राजकुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. या ट्विटमध्ये “कुणीतरी माझ्या पॅन कार्डचा (Pan Card) गैरवापर केला आहे. पॅनकार्डच्या आधारे माझ्या नावावर अडीच हजार रुपयांचं कर्जही घेतलंय. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे”, असं राजकुमार म्हणाला आहे. शिवाय “या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी आणि यापुढे असं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी”, असं राजकुमार म्हणाला आहे.

राजकुमारचं ट्विट

अभिनेता राजकुमार रावची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. ट्विट करत त्याने ही फसवणूक उघड केली आहे. या ट्विटमध्ये “कुणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे. पॅनकार्डच्या आधारे माझ्या नावावर अडीच हजार रुपयांचं कर्जही घेतलंय. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे”, असं राजकुमार म्हणाला आहे. शिवाय “या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी आणि यापुढे असं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी”, असं राजकुमार म्हणाला आहे.

राजकुमार रावचं हे ट्विट सध्या लोशल मीडियावर व्हायरल होतंय. या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत याला दुजोरा दिला आहे. आपल्यासोबतही असा प्राकार घडला असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. तर राजकुमारच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

राजकुमार रावचा नुकताच ‘बधाई दो’ हा चित्रपट रिलीज झाला. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकरही दिसली होती. या आधी शादी में जरूर आना, रूही, स्त्री या सारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर मोनिका, गन्स अँड रोजेस हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. याशिवाय राजकुमारने भूषण कुमारचाही एक चित्रपट साईन केला आहे. त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.

संबंधित बातम्या

Gudipadwa 2022 : डोंबवलीतील शोभायात्रेत ‘चंद्रमुखी’ सहभागी, पाहा अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचे खास फोटो…

Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास

My Dad’s Wedding : सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.