दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांना लिगल नोटीस; नेमकं प्रकरण काय आहे?

Bollywood Actress Deepika Padukone and Hrithik Roshan Legal Notice : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यांना लिगल नोटीस देण्यात आली आहे. या दोघांना लिगल नोटीस का आली? नेमकं हे प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर...

दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांना लिगल नोटीस; नेमकं प्रकरण काय आहे?
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 3:48 PM

मुंबई | 06 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधील दोन सुपरस्टारना लिगल नोटीस आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशनला लिगल नोटीस देण्यात आली आहे. दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला. या सिनेमातील काही सिन्सवर आक्षेप घेण्यात आला आहे. या सिनेमात हृतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन आहे. या सीन करताना या दोघांनी एअर फोर्सचा युनिफॉर्म घातलेला आहे. युनिफॉर्म घालून हा किसिंग सिन केल्याने इंडियन एअर फोर्सचा अवमान झाल्याचं म्हणत या दोघांना लिगल नोटीस देण्यात आली आहे.

‘फायटर’ला लिगल नोटीस

फायटर सिनेमातील किसिंग सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. इंडियन एअर फोर्सचे विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी या सीनवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी फायटर सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म घालून असे सिन देणं हा इंडियन एअर फोर्सचा अपमान आहे, असं विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटलं आहे.

आक्षेप काय?

इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म म्हणजे केवळ एखाद्या कापडाचा तुकडा नाही. चक देशाच्या रक्षणासाठी केलेला त्याग, अनुशासन आणि अतुट समर्पणाचं प्रतिक आहे. या सिनेमात दीपिका आणि हृतिक यांना एअर फोर्सच्या कमांडरच्या सदस्यांच्या रुपात दाखवलं आहे. त्यामुळे युनिफॉर्म घालून असा सिन करणं योग्य नाही, असं सौम्यदीप दास यांचं म्हणणं आहे.

लिगल नोटीसमध्ये काय?

फायटर सिनेमाला आलेल्या लिगल नोटीसमध्ये या किसिंग सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. देशाच्या या पवित्र प्रतीकाचा वापर सिनेमातील रोमॅन्टिक अँगलसाठी करणं योग्य नाही. हा आपल्या देशाची सेवा करणाऱ्या असंख्य जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एअर फोर्सच्या युनिफॉर्मवर असं काही करण्याला हा सीन सामान्य करतो. आपल्या देशाच्या सिमांचं संरक्षण करणाऱ्यांवर सोपलेल्या जबाबदारीविरोधात हा सिन चुकीचा मेसेज पोहोतचवतो, असं या नोटीमध्ये म्हणण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.