AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत धक्कादायक… चालत्या ट्रेनमधून प्रसिद्ध अभिनेत्रीने मारली उडी, लोकं ओरडली… शेवटी… काय घडलं? काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Karishma Sharma Accident : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री;चा मोठा अपघात झाला आहे. अभिनेत्रीने धावत्या लोकलमधून उडी घेतल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नक्की काय झालं?

अत्यंत धक्कादायक... चालत्या ट्रेनमधून प्रसिद्ध अभिनेत्रीने मारली उडी, लोकं ओरडली... शेवटी... काय घडलं? काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Actress Karishma Sharma AccidentImage Credit source: Instagram/@Karishmasharma22
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 12, 2025 | 12:38 AM
Share

टीव्ही आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री करिष्मा शर्मा हीने सोशल मीडियाद्वारे तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती शेअर केली आहे. करिष्माने तिचा मुंबई लोकलमधून प्रवास करताना अपघात झाल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा पश्चिम रेल्वे मार्गावरुन मित्रांसोबत प्रवास करत होती. करिष्मा रेल्वेत चढली. मात्र इतक्यात रेल्वेचा वेग वाढला. त्यामुळे तिच्या सोबत असलेल्या मित्रांना लोकल रेल्वे पकडता आली नाही. त्यामुळे करिष्मा घाबरली. घाबरलेल्या करिष्माने धावत्या लोकलमधून उडी मारली. त्यामुळे अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. करिष्माला या अपघातात दुखापत झाली आहे. सध्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिनेत्रीने तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी, असं आवाहन करिष्माने इंस्टा स्टोरीद्वारे चाहत्यांना केलं आहे.

अभिनेत्रीसोबत नक्की काय झालं?

“मी काल चर्चगेटला शूटनिमित्ताने जाण्यासाठी साडी नेसून जायचं असं ठरवलं. मी सर्वकाही ठरवल्यानुसार रेल्वेत चढले. रेल्वेचा वेग वाढला. त्यामुळे माझ्या सोबतच्या मित्रांना गाडी पकडता आली नाही. त्यामुळे मी घाबरले. मी भीतीपोटी उडी मारली. मी पाठीवर पडले. त्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला”, अशी माहिती अभिनेत्रीने इंस्टा स्टोरीद्वारे दिली.

अभिनेत्रीला तीव्र वेदना

“मला 1 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. मला कालपासून फार वेदना होत आहेत. मात्र मी धीट आहे. मी यातून लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा”, असं आवाहन अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना केलं.

अभिनेत्री करिष्मा शर्मा हीची व्हायरल इंस्टा स्टोरी

Karishma Sharma Accident Insta Story

Karishma Sharma Accident Insta Story

अभिनेत्रीसोबत झालेल्या या अपघातामुळे तिच्या चाहत्यांनाही झटका बसला आहे. आपली लाडकी अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

“तिला काहीच आठवत नाहीय”

दरम्यान करिष्माच्या मैत्रीणीने अभिनेत्रीचा हॉस्पिटलमधील एक फोटो पोस्ट केला आहे. करिष्माच्या मैत्रीणीने या फोटोद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “करिष्मासोबत असं काही झालंय यावर विश्वास बसत नाहीय. माझी मैत्रीण रेल्वेतून पडली. तिला काहीच आठवत नाहीय. करिष्माला आम्ही उचलून इथे आणलंय. डॉक्टर आताही अधिक तपास करत आहेत. लवकर बरी हो”, अशा भावना मैत्रीणीने व्यक्त केल्या.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?