Vicky –Katrina Wedding | लग्नाआधीच विकी-कतरिनाविरोधात तक्रार दाखल! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला राजस्थानच्या रॉयल फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. आजपासून (7 डिसेंबर) लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर आज कतरिना आणि विकीचा संगीत सोहळा आहे.

Vicky –Katrina Wedding | लग्नाआधीच विकी-कतरिनाविरोधात तक्रार दाखल! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
विकी कौशल, कतरिना कैफ

मुंबई : बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला राजस्थानच्या रॉयल फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. आजपासून (7 डिसेंबर) लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर आज कतरिना आणि विकीचा संगीत सोहळा आहे. यासोबतच या शाही लग्नाला येणारे पाहुणेही विमानतळावर स्पॉट होत आहेत.

तर, विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दुसरीकडे, राजस्थानचे वकील नेत्राबिंद सिंग जौदान यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात या दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. चौथ्या मंदिराजवळ 6 ते 12 डिसेंबर दरम्यान रास्ता बंद ठेवल्याप्रकरणी वकिलाने या दाम्पत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, वकिलाने सिक्स सेन्स फोर्ट बारवराचे हॉटेल व्यवस्थापक, कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल सिक्स सेन्स या मंदिराच्या वाटेवर असल्याने हॉटेल व्यवस्थापकाने जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हॉटेल सिक्स सेन्स येथून मंदिराकडे जाणारा रस्ता लग्नसराईमुळे पुढील सहा दिवस बंद राहणार असल्याने भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण येत आहे.

लग्नानंतर जोडपे त्रिनेत्र गणेश मंदिरात जाण्याची शक्यता!

अहवालावर विश्वास ठेवला तर रणथंभोर किल्ल्यात 1500 फूट उंचीवर गणपतीचे मंदिर आहे. ET ने दिलेल्या वृत्तानुसार, सवाई माधोपूरच्या स्थानिक लोकांनी शिफारस केली आहे की, विवाहित जोडप्याने आशीर्वाद घेण्यासाठी या गणेश मंदिरात जावे. सिक्स सेन्स बारवर रिसॉर्टपासून हे प्राचीन मंदिर 32 किलोमीटर अंतरावर आहे. रिपोर्टनुसार, लग्नात 120 पाहुणे सहभागी होऊ शकतात. विकी आणि कतरिनाच्या लग्नात शाही थीम असणार आहे. त्यांच्या लग्नात संगीत, मेहंदी आणि लग्न समारंभासाठी खास योजना करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, दोघांच्या लग्नाचे विधीही आजपासून सुरू होणार आहेत. विकी आणि कतरिना हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. या जोडप्याने आधीच आपल्या घरी कोर्ट मॅरेज केले आहे.

हेही वाचा :

Sai Tamhankar | सई ताम्हणकरला मिळालंय मानाचं स्थान! IMDBच्या ‘टॉप 10’मध्ये अभिनेत्रीचं नाव!

Vijeta | भूमिकेसाठी कायपण! अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेसाठी घटवले वजन!

icky-Katrina Wedding : विकी आणि कॅटरिना बनले पती-पत्नी, घरातच केलं लग्नाचं रजिस्टर मॅरेज!

काय म्हणता! बॉलिवूड चित्रपटांच्या कथांवर आधारित होत्या टीव्हीवरच्या प्रसिद्ध मालिका, तुम्हाला माहितीयेत का?


Published On - 11:51 am, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI