AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानच्या ‘Radhe’ची पायरसी कराल तर खबरदार! निलंबित केला जाणार व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय!

ईदच्या निमित्ताने नुकताच सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) रिलीज झाला आहे. कोरोनाच्या कहरामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलमान खानचा चित्रपट सध्या काही ओटीटी प्लॅटफॉर्मसह काही थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

सलमानच्या ‘Radhe’ची पायरसी कराल तर खबरदार! निलंबित केला जाणार व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय!
राधे
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: May 25, 2021 | 11:14 AM
Share

मुंबई : ईदच्या निमित्ताने नुकताच सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) रिलीज झाला आहे. कोरोनाच्या कहरामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलमान खानचा चित्रपट सध्या काही ओटीटी प्लॅटफॉर्मसह काही थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होताच पायरेसीला बळी पडला आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आता कडक निर्णय घेतला आहे (Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app  numbers).

व्हिडीओ शेअर करुन सलमान खानने आपल्या चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्यास सांगितले. यानंतरही एका फेसबुक वापरकर्त्याने हा चित्रपट बेकायदेशीरपणे डाऊनलोड केला आणि त्याचे पायरेटेड व्हर्जन व्हॉट्सअ‍ॅपवर 50 रुपयांना विकले. त्याच वेळी ‘झी’ने दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली.

पायरसी विरोधात हायकोर्टाचा कडक निर्णय

बातमीनुसार, सलमानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे’च्या पायरसी प्रकरणात आता हायकार्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला बेकायदेशीरपणे प्रसारित करण्यास बंदी घातली आहे. झीच्या वतीने असा आरोप केला गेला होता की, हा चित्रपट चोरीने डाऊनलोड करून आणि स्टोरकरुन मोठ्या प्रमाणात लोकांमधून प्रसारित केला जात आहे.

आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाने व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या बेकायदेशीररित्या प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर, ज्याद्वारे चित्रपटाच्या पायरसी कॉपी विकल्या जात होत्या, अशा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तर, दूरसंचार कंपन्यांना अशा ग्राहकांविषयी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरुन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करता येईल (Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app  numbers).

सलमानचा हा चित्रपट 50 रुपयांना विकला

अलीकडेच एक अशी बातमी आली होती की, अश्विनी राघव नावाच्या एका फेसबुक युजरने पोस्ट केले होते की, तो ‘राधे’ हा चित्रपट व्हॉट्सअ‍ॅपवर 50 रुपयांना विकत आहे. या बातमीनंतर सलमानच्या चाहत्यांनी कारवाईची मागणी केली. असे म्हटले जात आहे की, या मागची सत्यता तपासण्यासाठी झी वितरण पथकाने त्याच्याकडे चित्रपटाची मागणी केली, त्यानंतर त्याने 50 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रकरणी अश्विनीसह आणखी दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सलमानचा चित्रपट ‘राधे’ने पहिल्याच दिवशी ओटीटीवर 100 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. ‘राधे’मध्ये सलमान खानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे.

(Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app  numbers)

हेही वाचा :

Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?

भारतीयांच्या भावनांचा आदर, सलमानने चित्रपटातून वगळले, ‘या’ प्रकरणामुळे संपलं राहत फतेह अली खान यांचं करिअर!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...