भारतीयांच्या भावनांचा आदर, सलमानने चित्रपटातून वगळले, ‘या’ प्रकरणामुळे संपलं राहत फतेह अली खान यांचं करिअर!

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना भारतात पैसा, मान आणि सन्मान सर्वकाही मिळाले होते. बॉलिवूडमध्ये राहात यांनी 2003मध्ये पूजा भट्ट दिग्दर्शित फिल्म 'पाप' या सिनेमातून गायन करिअरची सुरुवात केली होती.

भारतीयांच्या भावनांचा आदर, सलमानने चित्रपटातून वगळले, ‘या’ प्रकरणामुळे संपलं राहत फतेह अली खान यांचं करिअर!
राहत फतेह अली खान
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 8:50 AM

मुंबई : बॉलिवूड आणि जगभरात प्रसिद्ध असलेले गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांच्या आवाजाची जादू प्रत्येकाचे कान तृप्त करते. राहत यांचा आवाज सर्व प्रकारच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी गायक आज या स्थानी आहेत, जिथे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज भासत नाही. भारतातही त्यांच्या आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. परंतु, ‘बॅन’नंतर त्यांच्या आवाजाची जादूही सध्या हरवली आहे (Rahat Faheh Ali Khan faces big loss after banned by India).

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना भारतात पैसा, मान आणि सन्मान सर्वकाही मिळाले होते. बॉलिवूडमध्ये राहात यांनी 2003मध्ये पूजा भट्ट दिग्दर्शित फिल्म ‘पाप’ या सिनेमातून गायन करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटात गायिलेलं त्यांचं पहिलं गाणं ‘लागी तुझसे मन की लगन’  हे प्रसिद्ध झालं होतं. हे गाणं रातोरात सुपरहिट झालं आणि राहत भारतातही स्टार गायक बनले.

भारतात ‘बॅन’ झाले राहत!

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशातील 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, त्यानंतर भारतात असणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली. त्यानंतर, नाईलाजास्तव फतेह यांना देखील भारत देश सोडवा लागला होता. ज्यावेळी राहत यांच्यावर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्याकडे अनेक स्टेज शो आणि चित्रपटदेखील होते, पण हे सर्व त्यांच्या हातातून निसटून गेले होते. त्यामुळे या गायकला पैसा आणि करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला. भारतातील बंदीमुळे राहत यांना त्यांच्या कारकीर्दीत मोठा तोटा झाला होता. कारण त्याच्या हातात बॅक टू बॅक चित्रपटत होते, गाणी होती आणि त्यासाठी त्यांना मोठी रक्कमही मिळत होती (Rahat Faheh Ali Khan faces big loss after banned by India).

किती होते मानधन?

असे म्हणतात की, राहत फतेह आली खान भारतात एक गाणे गाण्यासाठी 20 लाख रुपये मानधन आकारत असत. म्हणजेच, ते बॉलिवूडमधील सर्वात महागड्या गायकांपैकी एक होते. प्रत्यक्षात ते 20 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम घ्यायचे का? याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सलमानकडूनही दे धक्का!

भारतातील बंदीच्या मागणीनंतर ‘दंबग 3’मध्ये राहत फतेह अली खान यांची गाणी असणार होती. पण सलमान खानने आपल्या चित्रपटातील त्यांच्या आवाजातील दोन्ही गाणी चित्रपटामधून काढून टाकली होती. त्यानंतर राहत फतेह अली खान यांचा प्रवक्ता म्हणाला होता की, त्यांच्यात आणि बॉलिवूड स्टार सलमान खान यांच्यात काहीही वाद नाहीत. ते म्हणाले की, ‘दबंग 3’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड केलेली गाणी काढून सलमान खान केवळ भारतीयांच्या भावनांचा आदर करत आहे.

(Rahat Faheh Ali Khan faces big loss after banned by India)

हेही वाचा :

‘पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!’, आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी

Photo : ‘तेरी खुशी मेरी ख्वाहिश’, हीना खानची आईसाठी भावनिक पोस्ट

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.