सुशांत सिंह राजपूत याचा जुना व्हिडीओ पाहून चाहते रिया चक्रवर्ती हिच्यावर भडकले, म्हणाले काय केलेस तू हे…
सुरूवातीपासूनच सुशांतच्या निधनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता अडीच वर्ष होऊन गेले आहेत. परंतू परत एकदा सुशांत सिंह राजपूत चर्चेत आलाय. सुरूवातीपासूनच सुशांतच्या निधनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. यामध्ये कूपर रूग्णालयामधील कर्मचारी जे सुशांतच्या पोस्टमार्टममध्ये सहभागी होते, त्यांनी मोठा खुलासा केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण त्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, सुशांतला जेंव्हा रूग्णालयात आणले गेले होते तेंव्हा त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
कूपर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या दाव्यानंतर चर्चा सुरू झालीये. आता या चर्चांमध्येच सुशांत सिंह राजपूत याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ सुशांतचा शेवटचा व्हिडीओ आहे. इंस्टाग्रामवर सुशांतच्या फॅन पेजवर हा व्हि़डीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुशांतची तब्येत एकदम खराब झालेली दिसत आहे. इतकेच नाहीतर त्याला बोलण्यासही त्रास होत असून तो थांबून थांबून बोलताना दिसत आहे.
फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. अखेर रियाने असे का केले…हा प्रश्न व्हिडीओ शेअर करताना टाकण्यात आलाय.
सुशांतच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत रिया चक्रवर्तीला टार्गेट करत आहेत. एका युजर्सने लिहिले की, इतक्या चांगल्या व्यक्तीचा कोणी खून कसे करून शकतो….
