AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफवरील हल्ल्यासाठी विदेशी पिस्तुलाचा वापर, राजस्थानातून तिघे संशयित ताब्यात

टायगर श्रॉफ याच्या कारवर फायरिंगसाठी वापरलेल्या शस्रास्रांसंदर्भात नवीन माहिती मिळाली आहे. सुरुवातीच्या तपासात एक विदेशी पिस्तुलीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टायगर श्रॉफवरील हल्ल्यासाठी विदेशी पिस्तुलाचा वापर, राजस्थानातून तिघे संशयित ताब्यात
attack on Tiger Shroff
| Updated on: Oct 19, 2026 | 5:04 PM
Share

मुंबईतील जुहू परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बीएमडब्ल्यू कारवर रविवारी रात्री झालेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये पिस्तुला संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार हल्लेखोरांनी 7.62 एमएमच्या काडतूसाच्या सात राऊंड फायर केल्या होत्या. घटनास्थळावरुन पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. तर दोन जीवंत काडतूसे सापडली आहेत. पोलिसांना संशय आहे की हल्लेखोरांपैकी एकाकडे तुर्कीये येथील जिगाना (Zigana) पिस्तुल होती. मात्र, ही पिस्तुल अजून हस्तगत झालेली नाही.

हल्ल्यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ त्याचा कारमध्ये बसला होता. फायरिंगच्या वेळी टायगर श्रॉफ कसातरी वाचला मात्र, त्याच्या ड्रायव्हरसह दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करत आहे.

जिगाना पिस्तुलचे प्रकरण काय ?

सुरुवातीच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार फायरिंगसाठी वापरलेल्या शस्रामध्ये एक तुर्किये येथील जिगाना पिस्तुल म्हटले जात आहे. हल्ल्यावेळी झालेल्या फायरिंग वेळी एक पिस्तुल अचानक लॉक झाल्याने त्यातून संपूर्ण काडतूस बाहेर पडले आहे. त्यामुळे घटनास्थळी दोन जीवंत काडतूसं देखील सापडली आहेत. मात्र, यात नेमकी माहिती पोलिसांकडून देण्यात येणार आहे.

हल्ल्याच्या आधी केली होती रेकी

हल्लेखोरांनी घटनेच्या आधी या भागाची रेकी करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींना सांगितले की पुष्पा पार्कच्या जवळ ४५ मिनिटे हल्लेखोर टायगर श्रॉफची वाट पाहात होते. टायगर बाहेर निघून कारमध्ये बसताच फायरिंग सुरु करण्यात आली. व्हिडीओत तीन जण बाईकवर आल्याचे दिसत आहे. यातील एक जण बाईक चालवत उभा होता.तर दोन लोकांनी बाईकवरुन उतरुन टायगरच्या कारवर जवळून फायरिंग केली. सीसीटीव्हीत एका हल्लेखोराची पिस्तुल लॉक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे टायगरला बचावाची संधी मिळाली. घटनेनंतर आधीच तयार असलेल्या या बाईकवरुन हे तिघे जण फरार झाला.

कोटात तीन संशयित अटकेत

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवरील फायरिंगच्या प्रकरणात रेहान उर्फ सुक्का, ऋतिक कुर्मी उर्फ रोशन आणि एका अल्पवयीन तरुणाला राजस्थानच्या कोटातून अटक करण्यात आली आहे. तिघेही जण पुणे- जयपूर सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल कोचमधून प्रवास करत होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या टीपवरुन १५ मिनिटांच्या आत कोटा पोलिसांनी कारवाई करुन या तिघांना ताब्यात घेतले आहे. कोटा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात घटनेआधी अनिल पंडित याने रेहानशी संपर्क केला होता. रेहान याने एका अल्पवयीन तरुणाचा सोबत घेतले होते. तर मुंबईत राहणाऱ्या हृतिक याला या घटनास्थळाची माहिती होती. पोलिसांच्या माहितीनुसार या तिघांनी पैशासाठी ही फायरिंग केली आहे. त्यांचा हेतू टायगरचा प्राण घेण्याचा नव्हता तर त्याला केवळ घाबरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

Follow Us
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...