AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जॅकी श्रॉफसोबत पूलमध्ये धमाल करताना दिसली लेक कृष्णा, पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची (Jackie shroff) मुलगी कृष्णा श्रॉफ (Krishna shroff) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय स्टारकिडपैकी एक आहे. ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.

Video | जॅकी श्रॉफसोबत पूलमध्ये धमाल करताना दिसली लेक कृष्णा, पाहा व्हिडीओ
कृष्णा श्रॉफ
| Updated on: Apr 12, 2021 | 5:25 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची (Jackie shroff) मुलगी कृष्णा श्रॉफ (Krishna shroff) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय स्टारकिडपैकी एक आहे. ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. इतकेच नव्हे तर, ती भाऊ टायगर आणि वडील जॅकीसह मजेदार व्हिडीओ शेअर करते. कृष्णाचे फॅन फॉलोअर्स एखाद्या बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाहीत, लाखो लोक इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करतात. कृष्णाला बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस नाहीय. नुकताच कृष्णाने वडील जॅकी श्रॉफबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूप चर्चेत आला आहे (Jackie shroff enjoying in pool with daughter Krishna shroff).

कृष्णाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वडील जॅकीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये जकी श्रॉफ कूल पोझ देताना दिसत आहेत. व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर गाणी सुरु आहेत. बाप-लेकीची ही कुल जोडी पूलमध्ये भरपूर धमाल करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Elfaworld (@elfaworld)

कृष्णाच्या बिकिनी फोटोंची चर्चा

कृष्णाने सोशल मीडियावर बिकिनीमध्येही काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये कृष्णा आपली बोल्ड शैली दाखवताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाईल्ड चाईल्ड’ चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला आहे. काही तासांत हजारो लोकांनी या फोटोला लाईक्स केले आहेत.

पाहा कृष्णा श्रॉफचे बिकिनी फोटो :

 (Jackie shroff enjoying in pool with daughter Krishna shroff)

भाऊ टायगरला उचलले खांद्यावर

फिटनेसच्या बाबतीत कृष्णा ही भाऊ टायगरपेक्षा कमी नाही. वर्कआउट्स करताना ती व्हिडीओ शेअर करत राहते. अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने भाऊ टायगरला खांद्यावर उचलले आहे. व्हिडीओमध्ये टायगर आपली पिळदार शरीरयष्टी दाखवताना दिसला. दोन्ही भावंडांच्या चेहऱ्यावर हास्य होते. यानंतर कृष्णाने एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती भाऊ टायगरला उचलताना दिसली होती.

बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअपमुळे चर्चेत!

कृष्णाने गेल्या वर्षी तिचा प्रियकर एबन हायम्ससोबत ब्रेकअप केला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच, चाहत्यांना विनंती केली होती की, तिचे नाव आता हायम्ससह जोडले जाऊ नये. कारण, आम्ही आता एकत्र नाही. ‘सगळे चाहते खूप चांगले आहात. पण मला आता एबन हायम्ससोबत टॅग करु नका. कारण आता आम्ही एकत्र राहत नाहीत. त्यामुळे आमचं नाव एकत्र जोडू नका. तसंही ते सर्वश्रृत होतं. धन्यवाद…’, असं कृष्णा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हणाली होती.

(Jackie shroff enjoying in pool with daughter Krishna shroff)

हेही वाचा :

Video | काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर लेक न्यासाचे ठुमके, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केले कौतुक!

Video | ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला, पाहा नेमकं काय घडलं…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.