Video | काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर लेक न्यासाचे ठुमके, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केले कौतुक!

Video | काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर लेक न्यासाचे ठुमके, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केले कौतुक!
न्यासा देवगण

काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा (Nysa) हीची फॅन फॉलोइंग एखाद्या बड्या स्टारपेक्षा कमी नाही. न्यासा चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक फॅन पेज आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Apr 12, 2021 | 4:49 PM

मुंबई : काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा (Nysa) हीची फॅन फॉलोइंग एखाद्या बड्या स्टारपेक्षा कमी नाही. न्यासा चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक फॅन पेज आहेत. जिथे तिचे नवनवीन फोटो व्हायरल होत असतात. स्वत: काजोलने देखील एका मुलाखतीत सांगितले होते की, न्यासाला सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा सल्ला ती देत राहते. काजोलप्रमाणेच तिची लेक न्यासाला देखील नृत्याची खूप आवड आहे. सध्या न्यासाचा असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे (Nysa devgan performance on kajol iconic song).

न्यासाने तिच्या शाळेच्या एका कार्यक्रमात आई काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर नृत्य केले आहे. व्हिडीओमध्ये न्यासा आपल्या वर्गमैत्रींणसोबत ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘बोले चुडिया’ आणि ‘माय नेम इज खान’मधील ‘तेरे नैना’ या गाण्यांवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते न्यासाच्या डान्सचा खूप आनंद घेत आहेत.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये न्यासाने क्नॉटेड शर्टसह स्कर्ट परिधान केला आहे. ‘जब वी मेट’च्या गाण्यावर काजोलच्या मुलीने शाळेत सोलो डान्स केले होता. न्यासाचा हा व्हिडीओ तिच्या हजारो चाहत्यांनी अनेक वेळा पाहिला आहे.

न्यासा झाली ट्रोल

न्यासा देवगण काही काळापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. मंदिरात तोकडे कपडे परिधान करुन गेली होती. त्यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. न्यासाच्या कपड्यांबाबत सोशल मीडियावर अनेक टिप्पण्या केल्या गेल्या. एकदा न्यासा अधिक मेकअप घेऊन दिवाळी पार्टीत गेली होती. यानंतरही तिला सोशल मीडियावर अश्‍लील टिप्पण्यांना सामोरे जावे लागले होते (Nysa devgan performance on kajol iconic song).

काजोलने शेअर केला व्हिडीओ

काही काळापूर्वी काजोलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये न्यासाने सांगितले की, तिला ट्रोलचा सामना कसा करावा लागतो. तिने सांगितले होते की अजय देवगणने तिला ट्रोलर्सबाबत सल्ला दिला होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता अजय देवगन लवकरच ‘मे डे’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अजयसोबत अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रकुलप्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. देशभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने त्यांच्या चित्रपटाच्या शेवटच्या वेळापत्रकाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

(Nysa Devgan performance on kajol iconic song)

हेही वाचा :

Video | ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला, पाहा नेमकं काय घडलं…

Deepika Padukone | MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, दीपिका पदुकोणने दिले मोठे कारण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें