AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सहा बोटं असलेल्यांचा..”; भर कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर साधला निशाणा

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना अनेकदा हृतिकवर निशाणा साधताना दिसते. सध्या ती 'लॉक अप' (Lock Upp) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या शोमध्येही तिने हृतिकला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही.

सहा बोटं असलेल्यांचा..; भर कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर साधला निशाणा
Hrithik Roshan and Kangana RanautImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2022 | 1:28 PM
Share

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना अनेकदा हृतिकवर निशाणा साधताना दिसते. सध्या ती ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या शोमध्येही तिने हृतिकला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. कंगनाचा एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती हृतिकला टोला लगावताना दिसत आहे. ‘लॉक अप’च्या प्रीमिअर एपिसोडमधला हा क्लिप असून या शोने गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कंगना या शोची सूत्रसंचालक असून वीकेंडच्या एपिसोडमध्ये ती सेलिब्रिटी स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसते. माझ्या या नव्या शोमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे, असं ती व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतेय.

काय म्हणाली कंगना?

“जे लोक माझ्याशी पाच वर्षांपासून बोलत नव्हते, त्या लोकांचे मला आता फोन येऊ लागले आहेत, ते मला भेटवस्तू पाठवत आहेत. कंगनाचं मन राखून ठेऊयात, नाहीतर आत जाऊन ती आमची पोलखोल करेल, असा त्यांचा त्यामागचा विचार आहे. लोकं पाच बोटं जोडून हात जोडत आहेत. तसं तर सहा बोटं असलेल्या लोकांचाही घसा सुकतोय”, अशा शब्दांत तिने हृतिकला टोला लगावला आहे. कंगनाच्या या वाक्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर्वांत वाईट एक्स गर्लफ्रेंडचा पुरस्कार कंगनाला द्यायला हवा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे कंगनाच करू शकते,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

हृतिक आणि कंगना सुरुवातीला चांगले मित्र होते. मात्र या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हृतिकने कंगनावर काही आरोप केले. कंगनाने सतत ईमेल पाठवून त्रास दिल्याचा आरोप हृतिकने केला. 2016 मध्ये हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. हे प्रकरण सायबर सेलकडून सीआययुकडे वर्ग करण्यात आलं आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिकने मुंबई क्राईम ब्रांचकडे आपला जबाब नोंदवला होता.

लॉक अप हा शो अल्ट बालाजी आणि मॅक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आतापर्यंत या शोमध्ये मुनावर फारूखी, पूनम पांडे, सायशा शिंदे, पायल रोहतगी यांनी हजेरी लावली.

हेही वाचा: 

Video: ‘या अनुभवाला तोड नव्हती..’; वहिनीसाहेब धनश्रीच्या मुलाचा हा व्हिडीओ पाहिलात का?

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमारसोबत विनोदविरांचा कल्ला!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...