Emergency | राम गोपाल वर्मा यांच्या वक्तव्यावर कंगनाने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की…

| Updated on: Jul 24, 2022 | 11:11 AM

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे. यामध्ये इंदिरा गांधींची संपूर्ण 1984 ची मुलाखत देखील शेअर करण्यात आलीयं. इंस्टाग्रामवर हे ट्विट शेअर करताना कंगनाने लिहिले की, हाहा धन्यवाद सर, मी या भूमिकेत स्वत:ला कास्ट केले आहे कंगना स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Emergency | राम गोपाल वर्मा यांच्या वक्तव्यावर कंगनाने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की...
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानाैत (Kangana Ranaut) लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादात अडकला आहे. कंगना आणि वाद हे समिकरणच आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यानंतर कंगनाचे खूप कौतुक केले जात आहे. मात्र, या चित्रपटातून गांधी आणि नेहरू घराण्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी कंगनाचे कौतुक केले आहे.

इथे पाहा राम गोपाल वर्मा यांनी केलेले ट्विट

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटले की…

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे. यामध्ये इंदिरा गांधींची संपूर्ण 1984 ची मुलाखत देखील शेअर करण्यात आलीयं. इंस्टाग्रामवर हे ट्विट शेअर करताना कंगनाने लिहिले की, हाहा धन्यवाद सर, मी या भूमिकेत स्वत:ला कास्ट केले आहे कंगना स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एएनआयशी बोलताना कंगनाने सांगितले की, माझी शेवटची वेळ मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची होती आणि मला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण तो ब्लॉकबस्टर ठरला.

चित्रपटात अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका

या चित्रपटात अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. या चित्रपटात ते जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहे. कंगनाने ‘थलायवी’मध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली होती. त्याच्या व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक झाले. मात्र, गेल्या काही काळापासून कंगनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत कंगनाचा इमर्जन्सी चित्रपट काय जादु करेल हे बघण्यासारखे ठरणार आहे.