AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना दिले अत्यंत मोठे गिफ्ट, थेट तीन चित्रपटच…

कियारा अडवाणी हिने लग्नातील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर चाहत्यांसह अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटींनी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

Karan Johar | करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना दिले अत्यंत मोठे गिफ्ट, थेट तीन चित्रपटच...
| Updated on: Feb 10, 2023 | 5:29 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न अत्यंत खास पध्दतीने पार पडले. इतकेच नाही तर या लग्नामध्ये नो फोन पाॅलिशी फाॅलो करण्यात आली होती. म्हणजेच लग्नामध्ये कोणालाही फोन घेऊन जाण्यास किंवा व्हिडीओ (Video) आणि फोटो काढण्यास परवानगी नव्हती. अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडला. या लग्नाला फक्त १०० ते १५० पाहुणे उपस्थित होते. सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी याच्या लग्नातील फोटो पाहण्यास चाहते सुरूवातीपासूनच आतुर होते. कियारा अडवाणी हिने लग्नातील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर चाहत्यांसह अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटींनी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आता लग्नामधील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला खास करण जोहर याने उपस्थिती लावली होती. सोशल मीडियावर दोन दिवसांपासून चर्चा रंगत होती की, करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना काय गिफ्ट दिले?

आता करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना लग्नामध्ये काय गिफ्ट दिले हे समोर आले. रिपोर्टनुसार करण जोहर याने चक्क सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना तीन चित्रपटांसाठी साईन केले आहे.

खरोखरच करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. शेरशाह या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी हिट ठरली. या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी शशांक खेतान याचा नवीन चित्रपटासाठी साईन केला आहे. म्हणजेच काय तर आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कियारा ही लग्नमंडपात येताना दिसत असून सिद्धार्थ मल्होत्रा हा कियाराची वाट बघत थांबल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Follow Us
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष