AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandira Bedi : मंदिरा बेदीनं साजरा केला लेकीचा 5वा वाढदिवस, तारा आणि राजसोबत फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

मंदिरा बेदीनं तारासोबतचे काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पती राज कौशल आणि मुलगा वीर देखील दिसत आहेत. (Mandira Bedi celebrates daughter's 5th birthday, shared pictures with Tara and Raj)

Mandira Bedi : मंदिरा बेदीनं साजरा केला लेकीचा 5वा वाढदिवस, तारा आणि राजसोबत फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं नुकतंच निधन झालं आहे, त्यानंतर मंदिरा कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी ती आपल्या पतीच्या आठवणीत पोस्ट शेअर करत असते तर कधी ती आपल्या कुटूंबियांसह फोटो शेअर करते. मंदिरा बेदीची मुलगी तारा आज पाच वर्षांची झाली आहे आणि यानिमित्तानं मंदिरानं खास पोस्ट शेअर करत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंदिरानं तिच्याबद्दल सुंदर संदेश लिहिला असून, तिनं मुलगी ताराबरोबर स्वत: आणि कुटुंबियांचे काही फोटो शेअर केले आहेत.

5 वर्षांची झाली तारा

मंदिरा बेदीने तारासोबत तिचे काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा दिवंगत पती राज कौशल आणि मुलगा वीर देखील दिसत आहेत. हे शेअर करत तिनं आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “28 जुलै! तू आमच्या आयुष्यात येण्याला 1 वर्ष झालं आहे. गोड गोड तारा … आणि म्हणूनच आज आम्ही तुझा वाढदिवस साजरा करत आहोत. हा तुझा 5 वा वाढदिवस आहे, माझ्या बाळा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”. यासह मंदिरा बेदीनं पोस्टमध्ये इमोजी शेअर केले आहेत.

पाहा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

तारा मंदिरा बेदी मुलीची दत्तक घेतलेली मुलगी

तारा बेदी ही मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मागील वर्षी या जोडप्यानं ताराला दत्तक घेतलं होतं, महत्त्वाचं म्हणजे तिला भाऊ वीरनंही उघडपणे स्वीकारलं आहे. ताराला दत्तक घेतल्यानंतर मंदिरा बेदीनं एक सुंदर  व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला होता आणि अनेकदा मंदिरा तारासोबत फोटो शेअर करतानाही दिसते. पोस्टद्वारे मंदिरानं ज्या प्रकारे आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त केले आहे, ते तिच्या चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. (Mandira Bedi celebrates daughter’s 5th birthday, shared pictures with Tara and Raj)

संबंधित बातम्या

Net Worth : ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून हुमा कुरेशीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, एका चित्रपटासाठी घेते एवढी रक्कम

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला…

Sapna Chaudhary : विराट-अनुष्काप्रमाणेच हरियाणवी डान्सर सपना चौधरीचंही ठरलं, मुलाला देणार spotlight free आयुष्य

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.