Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला…

नुकतंच एका मुलाखतीत आदित्यला सोशल मीडियावर शोच्या नकारात्मक लोकप्रियतेबद्दल विचारलं असता त्यानं आपलं मत व्यक्त केलं. (Aditya Narayan's answer to trollers who called 'Indian Idol 12' scripted, said ...)

Indian Idol 12 : 'इंडियन आयडल 12' स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jul 28, 2021 | 1:31 PM

मुंबई : टेलिव्हिजनचा लोकप्रिय कार्यक्रम ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. हा शो काही कारणास्तव चर्चेत असतो. स्पर्धकांपासून ते जजच्या वक्तव्यापर्यंत हा कार्यक्रम अनेकदा ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी या शोविरोधात संताप व्यक्त केला. इंडियन आयडल 12 आपल्या भव्य समाप्तीपासून काही आठवडे दूर असताना होस्ट आदित्य नारायणनं शोला स्क्रिप्टेड म्हणून संबोधल्याबद्दल ट्रोलर्सला फटकारले आहे.

आदित्य नारायण म्हणाला..

नुकतंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्यला सोशल मीडियावर या शोच्या नकारात्मक लोकप्रियतेबद्दल विचारलं असता तो म्हणाला, “खरे सांगायचं तर मला या ऑनलाईन ट्रोलर्सला बोलण्यासाठी काहीच नाही. कारण त्यांच्याकडे दुसऱ्याला चांगलं म्हणायला काही नाही. ते फक्त त्यांची छोटी मानसिकता दाखवतात. जर तुमचं अंतःकरण प्रेमानं भरलं असेल तर तुम्ही प्रेमाने बोलाल आणि जर तुमच्यात द्वेष असेल तर ते निरुपयोगी आहे. ”

आदित्य नारायण पुढे म्हणाला, “टीव्हीच्या इतिहासात असा कोणताही शो नाही ज्याची स्क्रिप्ट नाही. स्क्रिप्टशिवाय कोणताही शो नाही. जर तुम्ही असं म्हणाल की हा शो स्क्रिप्टेड आहे, तर मी म्हणेन की प्रत्येक शोची स्क्रिप्ट असते. शोला एक फ्लो असतो जो शो चालवण्यासाठी आवश्यक असतो. म्हणून जेव्हा एखाद्या शो त्या फ्लोनुसार जातो तेव्हा तो स्क्रिप्टेड बनतो, नाही का? ”

सर्वांना आनंदी ठेवणं शक्य नाही

आदित्य म्हणाला की, “सर्वांना आनंदी ठेवणं शक्य नाही. मात्र तो प्रेक्षकांच्या अभिप्रायांचा विचार करतो. पुढे तो म्हणाला की, ‘इंडियन आयडल 12’ हा एक शो आहे, जो या संकटाच्या काळात चांगलं काम करत आहे. कालांतरानं या उद्योगात काम करणाऱ्या लोकांना रोजगार मिळवून देण्यात यश आलं आहे. तो म्हणाले की जेव्हा लोक या शोला आशीर्वाद देतील तेव्हाच हा शो यशस्वी होईल. ”

या दिवशी होणार फिनाले

‘इंडियन आयडल 12’ शोचा फिनाले 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फिनाले 12 तास चालणार आहे. स्पर्धकांबरोबरच शोचे चाहतेही फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Sapna Chaudhary : विराट-अनुष्काप्रमाणेच हरियाणवी डान्सर सपना चौधरीचंही ठरलं, मुलाला देणार spotlight free आयुष्य

Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच, सर्व बँक खात्यांची चौकशी होणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें