AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मधून शिल्पा शेट्टी कायमची आऊट? रितेश-जेनेलिया सांभाळणार परीक्षकपदाची धुरा!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेचा थेट परिणाम आता ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या (Super Dancer Chapter 4)  शूटिंगवर झाला आहे.

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मधून शिल्पा शेट्टी कायमची आऊट? रितेश-जेनेलिया सांभाळणार परीक्षकपदाची धुरा!
Shilpa-Genelia-Riteish
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेचा थेट परिणाम आता ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या (Super Dancer Chapter 4)  शूटिंगवर झाला आहे. शिल्पा शेट्टी गेल्या आठवड्यापासून ‘सुपर डान्सर’मधून गायब झाली आहे. मात्र शिल्पा शेट्टींच्या अनुपस्थितीत करिश्मा कपूरने तिची जागा घेत तिसर्‍या परीक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. येत्या शनिवार व रविवारमध्येही शिल्पा शेट्टी या शोचा भाग असणार नाहीय. तिच्या जागी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसुझा (Genelia D’souza) परीक्षक म्हणून गीता कपूर आणि अनुराग बासू यांची साथ देताना दिसतील.

जेव्हा सुपर डान्सरसाठी निर्मात्यांद्वारे रितेश आणि जेनेलिया संपर्क साधला गेला, तेव्हा त्यांनी तातडीने शोला होकार दिला. दोघांनाही हा शो खूप आवडतो. म्हणून जेव्हा ही ऑफर त्यांच्याकडे आली, तेव्हा त्यांनी तत्काळ सहमती दर्शवली. रितेश आणि जेनेलियाबरोबर या शोचे स्पर्धक जोरदार धमाका करणार आहेत. लवकरच हा संपूर्ण भाग चित्रित होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, येत्या एपिसोडमध्ये पती-पत्नीची जोडी या रंगमंचावरून पुन्हा एकदा त्यांच्या नृत्याने चाहत्यांना भुरळ घालेल.

चॅनेलशी कोणताही संवाद नाही!

पती राज कुंद्राच्या अटकेनंतरपासून ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ ची माजी परीक्षक शिल्पा शेट्टी ही घराबाहेरच पडलेली नाही. तर, सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीकडून सोनी टीव्हीशी कोणताही संवाद झाला नाही. म्हणूनच ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत मेकर्स पाहुणे परीक्षक आणि गीता कपूर-अनुराग बासू यांच्यासमवेत हा शो पुढे शूट करत आहेत.

शिल्पा शेट्टी परत येणार का?

एकंदरीत सध्याचा माहोल पाहता असे म्हणता येईल की, शिल्पा शेट्टी ही या सीझनमध्ये परत येणे खूप कठीण आहे. एकीकडे राज कुंद्रा प्रकरण आणि दुसरीकडे प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता शिल्पा शेट्टी पुढच्या हंगामातूनच थेट परत येऊ शकते.

हातातील सगळे प्रोजेक्ट बंद झाले, पतीवर संतापली शिल्पा!

अश्लील चित्रपट प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला तिचा नवरा राज कुंद्रा याला पाहून शिल्पा शेट्टी संतप्त झाली होती. 23 जुलै रोजी राज कुंद्राबाबत चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा खूप चिडली होती. ती पती राज कुंद्रावर ओरडली आणि म्हणाली, “तुमच्या व्यवसायामुळे माझ्या कुटुंबाची खूप बदनामी होत आहे. यामुळे, माझ्या अनेक असाइनमेंट्स आणि सगळे प्रोजेक्ट माझ्या हातातून गेले आहेत.”

(Shilpa Shetty out of ‘Super Dancer Chapter 4’ forever Ritesh and Genelia to take over as judge for next week)

हेही वाचा :

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Raj Kundra Case | हॉटशॉट्समधून अश्लील सामग्री काढण्यास सांगितले होते, साक्षीदार बनलेल्या कर्मचाऱ्यांचा दावा!

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.