AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
राज कुंद्रा
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी कोर्टाने त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने राजला 27 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने डेटा परत मिळवला जात आहे. राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना त्यांना Apple कडून 1 कोटी 13 लाख 64,886 रुपये मिळाले होते. ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे.

या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह आणखी 11 लोकांना अटक करण्यात आली. यात त्याचा आयटी हेड रायन थॉर्पे यांचा समावेश होता. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर, रायन याला राज याच्या अश्लील चित्रपटांचे रॅकेट चालत असल्याची पूर्ण माहिती होती. हे व्हिडीओ मुंबईतून यूकेमध्ये कसे हस्तांतरित केले जात होते, हे सर्वांनाच ठाऊक होते.

राज कुंद्राच्या घरी छापा

23 जुलै रोजी शिल्पा आणि राज यांच्या घरावरही गुन्हे शाखेने छापा टाकला होता. त्यादरम्यान शिल्पा शेट्टींची याच घरात सुमारे 6 तास चौकशी केली गेली. राज कुंद्राला अटक झाल्यापासून या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.

शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढू शकतात!

या प्रकरणी अहवालांनुसार शिल्पा शेट्टी हिच्या अडचणी या प्रकरणात वाढू शकतात. राजानंतर याची पत्नी-अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता पोलिसांच्या रडारवर आहे. अश्लील चित्रपट रॅकेटच्या मुद्द्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्राला पोलीस त्याच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा शिल्पा आणि राज कुंद्रा या दोघांमध्ये पोलिसांसमोरच जुंपली. इतकी सगळी लफडी केली पण मला काही कळू दिलं नाहीस, असं शिल्पा म्हणाली होती. एवढंच नव्हे तर त्यानंतर रडत रडतच तिने स्टेटमेंट दिलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अश्लील चित्रपट प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हाही शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण झालं होतं. या प्रकरणामुळे शिल्पाची प्रतिमा फारच मलिन झाली असल्याची तिला खंत आहे. आतापर्यंतच्या तपासात यामध्ये शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती आहे.

(Raj Kundra sent to judicial custody for 14 days)

संबंधित बातम्या :

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.