Raj Kundra Case | हॉटशॉट्समधून अश्लील सामग्री काढण्यास सांगितले होते, साक्षीदार बनलेल्या कर्मचाऱ्यांचा दावा!

अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, राज कुंद्राची कंपनी ‘वियान इंडस्ट्रीज’च्या चार कर्मचाऱ्यांनी या व्यावसायिकाविरूद्ध साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Kundra Case | हॉटशॉट्समधून अश्लील सामग्री काढण्यास सांगितले होते, साक्षीदार बनलेल्या कर्मचाऱ्यांचा दावा!
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 11:31 AM

मुंबई : अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, राज कुंद्राची कंपनी ‘वियान इंडस्ट्रीज’च्या चार कर्मचाऱ्यांनी या व्यावसायिकाविरूद्ध साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता काही ऑनलाईन वृत्तांत असा दावा केला जात आहे की, या कर्मचार्‍यांनी कबूल केले आहे की त्यांना हॉटशॉट्सवरील आक्षेपार्ह क्लिप्स काढून टाकण्यास सांगितले होते. ही वादग्रस्त सामग्री आहे, पोलिसांचा असा विश्वास होती की, ही प्रवाहित करण्यासाठी वापरली जात होती.

वृत्तानुसार, वियान इंडस्ट्रीजच्या या चार कर्मचार्‍यांची मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा यांना समोर ठेवून चौकशी केली होती. टीओआयच्या एका वृत्तानुसार, इंटेलिजन्स ब्युरोचा (आयबी) कर्मचारीही या प्रकरणात साथीदार असल्याचे समजले आहे. परंतु, या दाव्यांबाबत गुन्हे शाखेकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या रॅकेटची माहिती साक्षीदारांनी गुन्हे शाखेकडे दिली!

यापूर्वी राज कुंद्रा यांच्या कंपनीतील या कर्मचार्‍यांनी साक्षीदार झाल्यानंतर या प्रौढ सामग्री रॅकेटच्या ऑपरेशनची संपूर्ण माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे सोपवली असल्याचे वृत्त आहे. चार लोक साक्षीदार बनल्याच्या वृत्तामुळे राज कुंद्राची झोपच उडाली आहे, कारण या साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मुंबई गुन्हे शाखा राज कुंद्रा आणि या रॅकेटशी संबंधित लोकांवर कडक कारवाई करत आहे.

सध्या तुरूंगात असलेले राज कुंद्रा यांची पोलीस कोठडी आज संपली. राज कुंद्रा यांना आज पोलीस कोर्टात हजर केले जाईल. असा म्हटले जात आहे की, पोलिसांकडे राज कुंद्राविरोधात पुरावे आणि साक्षीदार आहेत, परंतु इतर ठोस पुराव्यांकरिता पोलीस पुन्हा एकदा राज कुंद्राच्या रिमांडचा पाठपुरावा करण्यासाठी कोर्टाला विनंती करू शकतात. 23 जुलै रोजी राज कुंद्राचा रिमांड वाढवण्यात आला असता, त्यांचे वकील सुभाष जाधव यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यासह त्यांनी राज कुंद्रा यांच्या अटकेस बेकायदेशीरही म्हटले होते.

काय म्हणाले वकील?

राज कुंद्रा यांच्या वकिलांनी म्हटले होते की, ‘राज कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. असा कोणताही व्हिडीओ नाही ज्यास अश्लीलता म्हटले जाऊ शकते. 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे, परंतु कलम 67 ए अन्वये बेकायदेशीरपणाचे प्रदर्शन करणार्‍या व्हिडीओमध्ये कोणत्याही स्पष्ट लैंगिक कृती दाखवू शकले नाहीत. विनंती केलेले इतर विभाग जामीन योग्य आहेत. याआधी सुप्रीम कोर्टाने मुनव्वर फारुकीला सोडले होते.’

(Raj Kundra Case Asked to remove pornographic material from hot shots, employees claim to have witnessed)

हेही वाचा :

Raj Kundra | राज कुंद्राची कस्टडी वाढवण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न, तर अटक बेकायदेशीर असल्याची हायकोर्टात याचिका

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतरही नव्या शुटिंगची तयारी, शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.