AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra | पाचव्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’चा दबदबा कायम, आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटींचे कलेक्शन

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाची मंगळवारी कमाई कमी झालीयं. या तुलनेत बाॅक्स आॅफिसवर सोमवारचा दिवस चांगला राहिला. गेल्या काही दिवसांमध्ये रिलीज झालेल्या बाॅलिवूड चित्रपटांचा विचार केला असता ब्रह्मास्त्र चित्रपट हिट ठरलांय.

Brahmastra | पाचव्या दिवशीही 'ब्रह्मास्त्र'चा दबदबा कायम, आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटींचे कलेक्शन
| Updated on: Sep 14, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई : ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office) जोरदार कलेक्शन करण्यास सुरूवात केली आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केली. पुढील काही दिवस चित्रपटाच्या कमाईसाठी महत्वाचे असल्याचे देखील सांगितले जात आहे. फक्त भारतामध्ये (India) मंगळवारपर्यंत ब्रह्मास्त्र चित्रपटाने 150.50 कोटींवर कमाई केली. मंगळवारी चित्रपटाचे कलेक्शन साधारण राहिले असून 13 कोटींची कमाई केली आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते.

पाचव्या दिवशी चित्रपटाने केली इतक्या कोटींची कमाई

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाची मंगळवारी कमाई कमी झाली. या तुलनेत बाॅक्स ऑफिसवर सोमवारचा दिवस चांगला राहिला. गेल्या काही दिवसांमध्ये रिलीज झालेल्या बाॅलिवूड चित्रपटांचा विचार केला असता ब्रह्मास्त्र चित्रपट हिट ठरलांय. आमिर खानचा लाल सिंह चढ्डा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे देखील चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फेल गेले. त्यामध्ये आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

ब्रह्मास्त्र चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची हिट

ब्रह्मास्त्र चित्रपटाला साऊथमध्ये काही खास प्रतिसाद मिळाला नाही. पाच दिवसांमध्ये 17.50 कोटी रुपये कमावले आहेत. हिंदी व्हर्जनमधून पाच दिवसांमध्ये 132.50 कोटींचे कलेक्शन ब्रह्मास्त्र चित्रपटाने केले. आता हे बघण्यासारखे ठरणार आहे की, हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होतो की नाही. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच ब्रह्मास्त्र चित्रपटाची प्रचंड चर्चा चाहत्यांमध्ये होती, चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...