AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR Box Office Collection: राजामौलींच्या RRRने ‘द बॅटमॅन’चा विक्रम मोडला; कमाई 500 कोटींच्या घरात

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

RRR Box Office Collection: राजामौलींच्या RRRने 'द बॅटमॅन'चा विक्रम मोडला; कमाई 500 कोटींच्या घरात
RRR box office collection Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2022 | 9:59 AM
Share

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे. राजामौलींच्या या बिग बजेट चित्रपटाने जरी 500 कोटींपर्यंत गल्ला जमवला असला तरी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा (Baahubali: The Conclusion) पहिल्या वीकेंडचा विक्रम अबाधित राहिला. बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 526 कोटी रुपये कमावले होते.

RRRची जगभरातील कमाई

पहिला दिवस- 257.15 कोटी रुपये दुसरा दिवस- 114.38 कोटी रुपये तिसरा दिवस- 118.63 कोटी रुपये एकूण- 490.16 कोटी रुपये

RRRची देशभरातील कमाई-

शुक्रवार- 20 कोटी रुपये शनिवार- 23.75 कोटी रुपये रविवार- 30 कोटी रुपये एकूण- 73.75 कोटी रुपये

25 ते 27 मार्च या वीकेंडमध्ये RRR जगभरात सर्वाधिक कमाई केल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिली. त्यामुळे ‘द बॅटमॅन’च्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचा विक्रम राजामौलींच्या चित्रपटाने मोडला आहे. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.

हेही वाचा:

Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...