Radhe : सलमान खानच्या ‘राधे’ची चर्चा, ‘सिटी मार’ गाण्यानं मोडले अनेक रिकॉर्ड

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिक्रियांसोबत, ‘सिटी मार’नं आपल्या प्रदर्शनाच्या अवघ्या 24 तासातच जवळपास सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. (Salman Khan's 'Radhe' Movie, 'Seeti Maar' song broke many records)

Radhe : सलमान खानच्या ‘राधे’ची चर्चा, ‘सिटी मार’ गाण्यानं मोडले अनेक रिकॉर्ड


मुंबई : ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’  (Seeti Maar) हे गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता, 26 एप्रिलला हे गाणं बॉलिवूडच्या दबंग खाननं अर्थात सलमान खाननं (Salman Khan) प्रदर्शित केलं. हे गाणं सध्या धुमाकूळ घालतंय सोबतच या गाण्यानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत..

चाहत्यांनी धरला गाण्यावर ठेका

आकर्षक बीट्स, सलमान-दिशा या दोघांची सेंसेशनल केमिस्ट्री आणि उत्तम डान्स मूव्ससोबत, ‘सिटी मार’नं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘सिटी मार’च्या ‘हुक स्टेप्स’ना प्रचंड पसंती मिळत असून चाहते या गाण्यावर शिट्ट्या आणि ठेका धरण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत.

प्रदर्शनाच्या अवघ्या 24 तासातच मोडले अनेक रेकॉर्ड

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिक्रियांसोबत, ‘सिटी मार’नं आपल्या प्रदर्शनाच्या अवघ्या 24 तासातच जवळपास सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. या गाण्यानं सर्वच मंचावर 30 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला असून 24 तासात जगभरातील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. प्रदर्शनानंतर काही वेळातच, हे गाणं ट्विटरवर #1 स्थानावर ट्रेंड करू लागलंय.

यूट्यूबवर वेगाने 2 लाख लाईक्स

या शिवाय, ‘सिटी मार’ यूट्यूबवर वेगाने 2 लाख लाईक्स मिळवणारं बॉलिवूड गाणं ठरलं असून इतक्या कमी वेळात यूट्यूबवर 2 लाखपर्यंत पोहोचणारे हे पहिलं गाणं आहे. हा डान्स नंबर यूट्यूबवर सद्या टॉपवर आहे.

कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं गाणं

‘सिटी मार’ या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार आणि संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे त्यांनीच यापूर्वी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ हा ट्रॅक तयार केला होता.

अनेक दिग्गज कलाकार झळकणार 

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर ‘पे-पर-व्यू’ सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘मनोरंजनात खंड नको…’, झी मराठीच्या मालिकांचं राज्याबाहेर शूटिंग

Photo : बॉलिवूडकरांच्या मालदीव व्हेकेशनवर मीम्सचा पाऊस, सोशल मीडियावर धुमाकूळ