AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटगृहांनंतर आता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार धमाका…जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट सत्यमेव जयते 2 गेल्या महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. 25 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता सत्यमेव जयते 2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यासाठी तयार आहे.

चित्रपटगृहांनंतर आता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार धमाका...जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार!
सत्यमेव जयते 2
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 10:37 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) चित्रपट सत्यमेव जयते 2 (Saytameva Jayate 2) गेल्या महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. 25 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता सत्यमेव जयते 2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यासाठी तयार आहे. सत्यमेव जयते 2 मध्ये जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात जॉन खास भूमिकेमध्ये दिसला आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे. यासाठी तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरज नाहीये. सत्यमेव जयते 2 OTT प्लॅटफॉर्मवर पुढच्याच आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमचा चित्रपट सत्यमेव जयते 2 हा 23 डिसेंबरला Amazon Prime वर रिलीज होणार आहे. टी-सीरीजने सत्यमेव जयते 2 चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

चित्रपटाची कथा नेमकी काय? 

कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांना चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सत्यमेव जयते 2 बद्दल बोलायचे झाले तर, जॉन अब्राहम या चित्रपटात भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसत आहे. त्यांना देशातून भ्रष्टाचार संपवायचा आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी दिव्या खोसला कुमार त्याला साथ देते.

सत्यमेव जयते 2 ची कथा अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराभोवती विणलेली आहे. जॉन अब्राहम व्यतिरिक्त, दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैधी आणि अनूप सोनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्याची कथाही मिलाप झवेरीने लिहिली आहे. टी-सीरीज आणि एमी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Friendship : मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीनं दिले दागिने

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....