AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या भावंडांना आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याची माहिती आहे. सख्खी बहीण रंगोली चंदेल, भाऊ अक्षत रनौत यांच्यासह चौघा भावंडांना कंगनाने फ्लॅट्स भेट दिले.

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय... जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!
| Updated on: Feb 03, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या भावंडांना आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याची माहिती आहे. सख्खी बहीण रंगोली चंदेल, भाऊ अक्षत रनौत यांच्यासह चौघा भावंडांना कंगनाने फ्लॅट्स भेट दिले. कंगनाने चंदिगढमध्ये चार कोटी रुपयांचे एकूण चार फ्लॅट्स विकत घेतल्याचं बोललं जातं कंगना आपली बहीण रंगोली आणि अक्षत यांच्याबाबत अत्यंत हळवी असल्याचं तिचे निकटवर्तीय सांगतात. कंगनाचं तिच्या कुटुंबावर आणि भावंडांवर निरतिशय प्रेम आहे. ती कायमच त्यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देते. प्रेमापोटीच तिने भावंडांवर गिफ्टचा वर्षाव केला आहे. सख्ख्या भावंडासोबतच आत्ते-चुलत भावांनाही तिने फ्लॅट्स गिफ्ट केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.  (Shah Rukh Khan gave  Arjun Rampal a BMW, Liberty gave each other expensive gifts)

kangana ranuat

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, अमिताभ बचन यांच्याविषयी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आभिताभ बचन यांचा जलवा बंगला त्यांना डायरेक्टर रमेश सिप्पीने शिफ्ट दिलेला आहे. सत्ते पे सत्ता या चित्रपटासाठी त्यांना हा बंगला देण्यात आला आहे.

sahrauk khan बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर शाहरुख खानचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. शाहरुख खानच्या नवीन चित्रपटाची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत होते. मात्र, तुम्हाला शाहरुख खानची एक गोष्ट माहिती आहे का, शाहरुख आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना त्याने BMW गिफ्ट दिल्या आहेत. त्यामध्ये रजनीकांत ते अजून रामपालपर्यंत नावे आहेत. या गाडीची किंमत जवळपास 1 करोडच्या आसपास आहे.

salman khan बॉलिवूड अभिनेता सलमान खानने बहिण अलवीरा अग्नीहोत्रीला मुंबईमध्ये एक पेंटहाऊस गिफ्ट केले होते त्याची किंमत जवळपास 10 करोड ते 16 करोडपर्यंत आहे. मध्यंतरी सलमानने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामागारांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सलमान खानने आज 16,000 कामगारांच्या बँक खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले होते.

amir khan बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव नेहमीच चर्चेत असतात. आमिर खानने किरण रावला एक खूप महाग टूर गिफ्ट केला होता. हा टूर अमेरिकेतील महाग शहरात होता. या टूरसाठी आमिरला जवळपास 75 करोड खर्च करावे लागले होते. आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता.

abhishek bachchan अभिनेता अभिषेक बचन आणि अभिनेत्री ऐश्वर्या बचन यांची मुलगी आराध्या बचन हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त यांनी Mini cooper s गिफ्ट दिली होती.काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. अभिनेते अभिषेक बच्चन यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली होती. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. shilpa shetty प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे 2009 मध्ये लग्न झाले आहे. शिल्पा तिच्या चाहत्यांसाठी तिचे आणि राजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राज कुंद्राने शिल्पाला दुबईतील प्रसिध्द बुर्ज खलीफामध्ये 11 मजल्यावर घर गिफ्ट दिले होते. मात्र, काही दिवसांनी शिल्पाने ते विकले आहे असे सांगितले जाते. 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लगीनगाठ बांधली. राज आणि शिल्पा ‘आयपीएल’मधील ‘राजस्थान रॉयल्स’ क्रिकेट संघाचे मालक आहे. 2012 मध्ये शिल्पाने मुलगा विआन कुंद्राला जन्म दिला. आणि काहीच दिवसांपूर्वी तिने एका मुलीलाही जन्म दिला आहे.

संबंधित बातम्या : 

आधी लव्ह, लव्ह, लव्ह नंतर लग्नही केलं पण मग मोडलं का? सुशील ,संस्कारी टीव्ही सुनांचं वास्तवादी आयुष्य !

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

(Shah Rukh Khan gave  Arjun Rampal a BMW, Liberty gave each other expensive gifts)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.