AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saroj Khan Biopic | सरोज खान यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर चितारणार, टी-सीरीजच्या भूषण कुमारांची घोषणा!

टी-सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांचा बायोपिक जाहीर केला आहे. सरोज खान यांचे गेल्या वर्षी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

Saroj Khan Biopic | सरोज खान यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर चितारणार, टी-सीरीजच्या भूषण कुमारांची घोषणा!
सरोज खान
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 03, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : टी-सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांचा बायोपिक जाहीर केला आहे. सरोज खान यांचे गेल्या वर्षी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बायोपिकविषयी बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या, परंतु त्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळू शकली नव्हती. आता भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी पुष्टी केली आहे की, ते दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचा बायोपिक बनवतील (T series fame Bhushan Kumar announces Biopic of Saroj Khan).

सरोज खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका होता, ज्यांच्या तालावर हिंदी सिनेमाच्या अनेक दिग्गज कलाकारांनी नृत्य केले. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी अशा अनेक स्टार्सचा समावेश होता. चार दशकांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी सुमारे 350चित्रपटातील दीड हजाराहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले.

80च्या दशकात मिळाली लोकप्रियता

80च्या दशकाच्या उत्तरार्धात श्रीदेवी यांच्या ‘मैं नागीन तू सपेरा’ (नगीना) आणि ‘हवा हवाई’ (मिस्टर इंडिया) गाण्यांवरील कोरिओग्राफीमुळे सरोज खान यांना अधिक लोकप्रियता मिळाली. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सरोज खान यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ मधील ‘डोला रे डोला’, माधुरी दीक्षित स्टारर ‘तेजाब’ आणि 2007च्या ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क’ यासह काही संस्मरणीय गाण्यांची कोरिओग्राफ केली होती.

सलमानकडून मदतीचा हात

सरोज खान या खूप मोठ्या नृत्यदिग्दर्शिका होत्या, परंतु त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांना काम मिळणे बंद झाले. याचा खुलासा स्वत: सरोज खान यांनी आपल्या एका मुलाखतीत केला होता. काम नसताना सलमान खानने त्यांना मदत केल्याचे सरोज खान यांनी सांगितले होते. एक दिवस सलमान खान त्याच्या घरी पोहोचला आणि त्यांना विचारले की, सध्या तुम्ही काय करत आहात?

सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर देताना सरोज खान म्हणाल्या होत्या की, काहीही नाही, मी फक्त काही अभिनेत्रींना नृत्य शिकवत आहे. हे ऐकून सलमानने त्यांना सांगितले की, आतापासून तुम्ही माझ्याबरोबर काम कराल. सरोज खान म्हणाल्या की, सलमान आपल्या बोलण्यावर ठाम आहे हे मला आधीच ठाऊक होते. तथापि, सलमान खान आणि सरोज खान यांच्यातल्या वादविवादाची बातमीही मीडियापासून लपलेली नव्हती. असे म्हटले जाते की, सलमान खानने आपल्याला चित्रपटातून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. कारण सलमानला असे वाटले की, त्याने नृत्यात नेहमीच आमिरला अधिक महत्त्व दिले आहे.

(T series fame Bhushan Kumar announces Biopic of Saroj Khan)

हेही वाचा :

Kiran Rao Net Worth | आमिर खानशी घटस्फोटानंतरही करोडोंची मालकीण असणार किरण राव, जाणून घ्या एकूण संपत्तीबद्दल

रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ