अचानक कपाट उघडायचं, संगीत वाजायचं… सलमानच्या खोलीत भूत? भाईजान म्हणाला, मी त्याला…

सलमान खानने 'कॉफी विथ करण 9' मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमधील आपल्या खोलीतील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तो कधीच खोलीत एकटा नसतो, एका अदृश्य अस्तित्वाची त्याला जाणीव होते असे त्याने म्हटले. लाइट्स चालू-बंद होणे, कपाट उघडणे असे प्रकार घडायचे. हा खुलासा ऐकून करण जौहरही आश्चर्यचकित झाला.

अचानक कपाट उघडायचं, संगीत वाजायचं... सलमानच्या खोलीत भूत? भाईजान म्हणाला, मी त्याला...
salman khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 10:24 PM

अभिनेता सलमान खानने करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण 9’ या शोमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे. त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील खोलीत विचित्र भास झाल्याचं त्याने सांगितलंय. मी माझ्या खोलीत कधीच एकटा राहिलो नाही. माझ्यासोबत कोणी तरी असायचं. मी त्या व्यक्तीला कधीच पाहिलं नाही, असं सलमान खानने सांगितलं. सलमानचं हे बोलणं ऐकून करण जौहरची बोलतीच बंद झाली. सलमानला भूताचा भास व्हायचा. पण आता त्याला त्या भूताचा भास होतो की नाही हे त्याने सांगितलं नाही.

यावेळी करण जौहरने जब प्यार किसी से होता है या सिनेमाच्या शुटिंगचा किस्साही सांगितला. या सिनेमाच्या शुटिंगवेळी मी तुला कुछ कुछ होता है या सिनेमाची कहाणी ऐकवायला आलो होतो. मी दुपारी 2 वाजता आलो होतो. तेव्हा तुझी शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असल्याचं मला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मला सांगितलं 9 वाजता घरी ये आणि मला कहाणी ऐकव, असं करण म्हणाला.

Loading...

 

यावेळी करणने सलमान कुटुंबासह राहत असल्याचं सांगितलं. मी सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, सलमान आपल्या कुटुंबासोबत राहतो. अरबाज, सोहेल, सलमान, सलमा आंटी, सलीम साहेब आणि प्रत्येकजण… आणि तुझी रुम अत्यंत छोटी आहे. तुझ्या खोलीत एक कपाट आहे. एक बेड होता. मी हे पाहून थक्कं झालो. सलमान खानचा रुम म्हणून मी आत आलो. तेव्हा तू आत बसलेला होता. अंगावर कपडे नव्हते. केवळ पिवळ्या रंगाचा एक शॉर्ट होता. याच्या मनात काही दुसरा विचार येऊ नये, असं तेव्हा मला वाटलं आणि मी दुसरीकडे पाहून तुला कहाणी ऐकवू लागलो, असं करणने सांगितलं.

तिथे कोणी तरी आहे…

करण बोलत असतानाच सलमानने त्याला टोकलं. सलमान म्हणाला, तुला माहीत आहे का, मी त्या रुममध्ये एकटा राहत नाही. मी तिथे एका अशा व्यक्तीसोबत राहतो, ज्याला मी कधीच पाहिलं नाही. केवळ ऐकलं आहे. त्याचा भास मला झालाय, असं सलमान म्हणाला. त्यावर कोण? असं करणने विचारलं. त्यावेळी हातवारे करत सलमान म्हणाला, कल्पना नाही कोण आहे. मी जेव्हा जेव्हा बाहेर जायचो, तेव्हा लाईट चालू बंद व्हायची, असं सलमानने म्हणताच करणचे कान टवकारले.

कपाट आपोआपच उघडायचं. संगीत वाजायला सुरुवात व्हायची. मी जेव्हा बाथरूमला जायचो, तेव्हा कोणी तरी बाहेर असल्याचं मला जाणवायचं. माझ्या कपाटातील सामान विस्कटवलं जायचं. कपाट उघडलं जायचं. त्यावेळी मला कळलं की तिथे कोणी तरी आहे. वा काही तरी आहे, असं सलमानने सांगितलं.

तुला भीती वाटली नाही? असा सवाल करणने केला. नाही, भीतीदायक नाही. पण तिथे कोणी तरी असल्याचा मला भास व्हायचा. मी जेव्हा प्रत्येकवेळी म्युझिक सुरू करायचो, तेव्हा माझ्या मागे कोणी तरी आहे, याचा मला भास व्हायचा. त्यामुळे तुला गाणं ऐकायचं का? कोणतं गाणं ऐकायचं? असं विचारायचो. त्यानंतर मी कोणतंही बटन दाबून गाणं सुरू करायचो आणि तिथून निघून जायतो, असं त्याने सांगितलं.

तिथे पूर्वी एक बिलियर्ड्स टेबल असायचा. आम्ही बिलियर्ड्स खेळायचो. आम्हाला आत कुणाचा तरी आवाज यायचा. माझं कपाट उघडलं, गाणं वाजायला सुरुवात झाली, असं सलमानने सांगितलं. त्यावर करणने पुन्हा तुला भीती नाही वाटली का? असा सवाल केला. त्यावर नाही नाही… मला भीती नाही वाटली. तो काही करत नसायचा. मी फक्त त्याला एवढंच सांगितलं होतं की, तू एखादी प्रचंड सुंदर महिला असशील तरच मला तुझा चेहरा दाखव, असंही तो म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us