तिहार जेलमध्ये ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल इतक्या वेळा सुकेश चंद्रशेखरला गेली होती भेटायला…

काही अभिनेत्री तर सुकेशला भेटण्यासाठी चक्क दिल्लीतील जेलमध्ये गेल्या असल्याची देखील माहिती पुढे येतेय.

तिहार जेलमध्ये 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल इतक्या वेळा सुकेश चंद्रशेखरला गेली होती भेटायला...
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 11:01 AM

मुंबई : 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) EOW ने अत्यंत मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखरमुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणींमध्ये अगोदर मोठी वाढ झालीये. इतकेच नाही तर याप्रकरणी अनेक अभिनेत्रींची नावे देखील पुढे आली येत. काही अभिनेत्री तर सुकेशला भेटण्यासाठी चक्क दिल्लीतील (Delhi) जेलमध्ये गेल्या असल्याची देखील माहिती पुढे येतेय. काही दिवसांपूर्वी जेलमध्ये सुकेशला तब्बल 5 अभिनेत्री भेटायला गेल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, आताच मिळालेल्या माहितीप्रमाणे अभिनेत्री निक्की तांबोळी सुकेशला जेलमध्ये एकदा नव्हे तर तब्बल दोनदा भेटायला गेली होती.

आर्थिक गुन्हे शाखेचे EOW चे दिल्लीचे विशेष सीपी रवींद्र यादव यांनी निक्की तांबोळीचे नाव घेतले आहे. निक्की सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी दोनदा जेलमध्ये गेली होती. अभिनेत्री निक्की तांबोळीची 23 सप्टेंबरला चौकशी करण्यात आलीये.

यावेळी तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केलाय. निक्की सुकेशला भेटण्यासाठी दोनदा तिहार जेलमध्ये गेली होती. पिंकी इराणीने सुकेशला भेटण्यासाठी निक्कीला जेलमध्ये नेले होते.

पिंकी इराणीने निक्की तांबोळीला सुकेश चंद्रशेखर हा एक मोठा चित्रपट निर्माता असल्याचे सांगितले होते. मात्र, यावेळी निक्कीला सुकेश आणि पिंकीवर संशय निर्माण झाला होता, असे स्वत: निक्कीने सांगितले आहे.

रिपोर्टनुसार सुकेशने निक्कीला 3 लाख रूपये आणि अत्यंत महाग एक बॅग दिली होती. मात्र, यावर निक्कीने सांगितले आहे की, मला सुकेशने कधीच पैसे किंला बॅग दिलेली नाहीये. फक्त निक्कीच नाही तर अनेक अभिनेत्री या सुकेशला भेटण्यासाठी यापूर्वी जेलमध्ये गेल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.