‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचं शाहरुख खानच्या मुलावर जडलं प्रेम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 15, 2022 | 7:30 PM

एका अभिनेत्रीने खुलेपणानं आर्यनबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. या अभिनेत्रीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यासोबत 'मॉम' या चित्रपटात काम केलं होतं.

'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं शाहरुख खानच्या मुलावर जडलं प्रेम
Aryan Khan
Image Credit source: Instagram

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता. सोशल मीडियावर आर्यनचेही असंख्य चाहते असून अनेकदा ते त्याचा बचाव करताना दिसतात. आता एका अभिनेत्रीने खुलेपणानं आर्यनबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. या अभिनेत्रीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यासोबत ‘मॉम’ या चित्रपटात काम केलं होतं. इन्स्टाग्रामवर आर्यनचा फोटो पोस्ट करत तिने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

सजल अली या पाकिस्तानी अभिनेत्रीचं आर्यनवर प्रेम जडलंय. सोशल मीडियावर आर्यन फारसा सक्रिय नसला तरी त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत. सजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आर्यनच्या इन्स्टाग्रामवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये तिने शाहरुख आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटातील ‘हवायें’ हे गाणं लावलं आहे. त्याचसोबत त्यावर हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. सजलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajal Ali (@sajalaly)

सजलने 2017 मध्ये रवी उदयवारच्या मॉम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने तिने श्रीदेवी यांची मुलगी आर्याची भूमिका साकारली होती. 2020 मध्ये तिने बॉयफ्रेंड आणि सहकलाकार अहाद रझा मीर याच्याशी अबु धाबीमध्ये निकाह केला.

सजल पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे. शेखर कपूर दिग्दर्शित ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ या चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI