Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर…

अजय देवगण (Ajay Devgan), तब्बू (Tabu) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांचा थ्रिलर चित्रपट फिल्म दृश्यम 2015 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:17 AM, 19 Jan 2021
Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर...

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgan), तब्बू (Tabu) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांचा थ्रिलर चित्रपट  दृश्यम 2015 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम देखील मिळाले अनेक रिकाॅर्ड आजही या चित्रपटाच्या नावावर आहेत. मात्र, त्यावेळेला कोणाही विचार केला नसेल की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर साडेपाच वर्षांनंतर कोणी चित्रपट पाहून एखादी हत्या करेल, 14 जानेवारीला बोइस पोलिसांनी 34 वर्षीय सूरजला अटक केली ज्यांने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. (Young man kills girlfriend after watching Ajay Devgan’s Drishyam film)

सूरज आणि अमिता 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे हे नाते अमिताच्या घरातील लोकांनी स्वीकारले देखील होते. 21 ऑक्टोबरला दोघे लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते, परंतु अमिता परत घरी आली नाही किंवा तिचा संपर्कही होऊ शकला नाही. यानंतर अमिताच्या घरच्यांना सूरजने मेसेज करून सांगितले की, आम्ही लग्न केले आणि आम्ही वापीला शिफ्ट झालो आहोत. परंतू त्यानंतर आमिताच्या कुटुंबीयांनी सूरजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही  आमिताच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गेल्या आठवड्यात अमिताच्या भावाने सूरजला बोइसमध्ये पकडले मात्र, सूरत तेथून निघून गेला त्यानंतर पोलिसांनी पुन्हा सूरजला पकडले आणि मग सर्व सत्य समोर आले आणि सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. अमितासोबत लग्न करायचे नसल्याचे सूरजने सांगितले पण ती वारंवार त्याच्यावर दबाव आणत होती. अमिताच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या सूरजने अमिताचा गळा बेल्टने आवळून हत्या केली आणि तिचे शरीर प्लास्टिकमध्ये झाकले आणि तिचा मृतदेह भिंतीत लपून टाकला. सूरजने पोलिसांना सांगितले की, ही कल्पना ‘दृश्यम’ चित्रपटामधून त्याला मिळाली होती.

संबंधित बातम्या : 

Debut | जाह्नवी नंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, बोनी कपूर म्हणाले…

Shocking | दिवस रात्र कामाने आलिया टेन्शनमध्ये, केलं हॉस्पिटलमध्ये दाखल!

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं

(Young man kills girlfriend after watching Ajay Devgan’s Drishyam film)